अकोट(प्रतिनिधी)- अकोट विधानसभा मतदारसंघ भाजपाने जन्माने व कर्माने स्थानिक आहेत त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशी जनभावना आहे, अशी माहीती भाजपाचे अकोट नगरपरिषद अध्यक्ष हरीनारायण माकोडे यांनी दिली.
अकोट मतदारसंघात अकोट व तेल्हारा नगराध्यक्ष या दोंघानी उमेदवारी मागणी केली आहे. त्यामुळे भाजपाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या कार्यावर प्रश्न्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेब्रुवारी २०१८ मध्ये नगराध्यक्षांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये त्यांनी आजचा नगराध्यक्ष उद्याचा आमदार असेल असे सूतोवाच केले होते. शिवाय अकोट मतदारसंघांमध्ये सुद्धा स्थानिक उमेदवार असावा अशी भावना आहे. त्यामुळे आपण भाजप पक्षश्रेष्ठीकडे अकोट मतदारसंघातील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.