बाळापूर (डॉ शेख चांद)- बाळापूर शहरात दरवर्षी मोहरम मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दरवर्षी सवाऱ्या, मौला ह्यांची स्थापना होते. ह्या वर्षी जवळपास 45 सवाऱ्या बसल्या आहेत. त्यांचे 9 आणि 10 सप्टेंबर ला वेग वेगळी मिरवणूक निघून संपणार आहेत. परंतु मोहरम चे मौला, निशाणी, झुल्फिकार ह्यांना घेऊन मुख्य मिरवणूक निघते. सदर मिरवणुकी मध्ये संपूर्ण अकोला जिल्हा व बाहेरूनही मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने येतात. सदर मिरवणूक आणि गणेश विसर्जन मिरवणूक एकाच दिवशी 12 सप्टेंबर ला येत होती. परंतु बाळापूर चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी सवाऱ्या आणि मौला बसविणाऱ्या प्रमुख लोकांच्या वारंवार मीटिंग घेऊन सर्व सहमतीने मोहरम ची मुख्य मिरवणूक 13 सप्टेंबर रोजी रोजी निघणार असल्याचे जाहीर केले आहे. त्या साठी सदर मिरवणुकी साठी बाळापूर चे बाहेरून येणाऱ्या सर्व मुस्लिम बांधवानी ह्याची नोंद घ्यावी असे आवाहन बाळापूर शहरातील मोहरम मिरवणुकीच्या आयोजकांनी केले आहे.