अकोला (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघ अकोला जिल्हाच्या वतीने मा.नानासाहेब घोलप यांच्या आदेशानुसार व मा. गजानन भटकर व पश्चिम युवा प्रमुख मा. रामभाऊ उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, दिल्ली येथील तुगलकाबाद येथील 600 वर्षे पुरातन संत रविदास महाराज मंदिर पाडले. या बाबात भारत बंदचे आवहन करण्यात येत आहे.
अकोल्यातील सर्व व्यावसायिक व दुकानदारानी आपले आपले दुकाने बंद ठेवून भारत बंद मध्ये सामील व्हावे. सर्व पदाधिकारी व समाज बांधवांनी संत रविदास महाराज मंदिर लहान उमरी अकोला येथे शहर बंदची हाक देणे करीता दि. 6 तारखेला शुक्रवारी ठीक सकाळी नऊ वाजता मोटारसायकल रँली काढण्याकरिता करीता हजर राहावे. प्रत्येक तालुका अध्यक्ष यांनी आपल्या तालुक्यातील सर्व दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन जिल्हा अध्यक्ष प्रकाश ठोंबरे, जिल्हा शहर अध्यक्ष शिवलाल भाऊ इंगळे, महासचिव सुनिल झेड गवई, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण चोपडे, शहर युवा अध्यक्ष सुमित पानझाडे, ग्रामीण युवा अध्यक्ष निलेश बोरकर, जिल्हा महिला अध्यक्षा प्रतिभाताई शिरभाते, शहर महीला अध्यक्षा छायाताई इंगळे, जेष्ठ नागरिक अध्यक्ष श्री.पांडुरंग वाडेकर, अकोला तालुका अध्यक्ष कीशोरभाऊ काकडे, पातुर तालुका अध्यक्ष छगन पुरोषत्तम, अकोट तालुका अध्यक्ष रवि मालखेडे, तेल्हारा तालुका अध्यक्ष नागोराव ठोसरे, बार्शीटाकळी तालुका अध्यक्ष सदिप कदम, बाळापुर तालुका अध्यक्ष भोनाजी ठोंबरे यांनी आव्हान केले आहे, असे प्रसिद्ध प्रमुख योगेश इंगळे यांनी कळविले आहे.