तेल्हारा(प्रतिनिधि)- तेल्हारा येथील टॉवर चौक येथे विराजमान होणारे टॉवर चौक का राजा गणेशोत्सव मंडळाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली यामध्ये अध्यक्ष पदी पियुष वैष्णव तर उपाध्यक्ष पदी गणेश इंगोले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
शहरातील पोस्ट ऑफिस जवळ दरवषी प्रमाणे यावर्षी सुद्धा टॉवर चौक का राजा गणेशोत्सव मंडळाची कार्यकारणी जाहीर करून मंडपाचे भूमी पूजन संपन्न झाले. यावेळी कार्याध्यक्ष पदी रिषभ पिंजरकर यांची निवड करण्यात आली.यावेळेस उपस्थित उमेश पांडे ,राजू पाडिया,आशिष डांगे,प्रकाश शर्मा ,किरण वाने, गजानन महल्ले, संजय गावंडे ,विजय, भाऊ मुंजाळे, संजय डांगे,प्रमोद सोनटक्के,राजेश डांगे , वैभव शिंगणे व सर्व टॉवर चोक का राजा मंडळ चे कार्यकर्ते हजर होते