• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 23, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

लोकचळवळीतील क्रियाशील नेतृत्व अनिल गावंडे यांचा  शिवसेनेत प्रवेश,पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन

Editor by Editor
May 28, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
लोकचळवळीतील क्रियाशील नेतृत्व अनिल गावंडे यांचा   शिवसेनेत प्रवेश,पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
11
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

*शेकडो समर्थकांचाही प्रवेश

*अनेक मान्यवरांची उपस्थिती

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुंबई(प्रतिनिधी)- लोकजागर मंच चे संस्थापक अनिलभाऊ गावंडे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह मुंबईत सेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे सेनेत स्वागत केले.

यावेळी सेनेचे जेष्ठ आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, उप जिल्हाप्रमुख गोपाल दातकर,युवासेना जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप पाटील,माजी जि. प. सदस्य महादेव गवळे, लोकजागरचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरोकार, सुधाकर खुमकर, गोपाल जलंमकार, दिलीप पीवाल, पप्पू सोनटक्के, रामा फाटकर, श्रीकांत पागृत, तात्या टाले, प्रवीण देशमुख, प्रवीण वैष्णव, सरपंच प्रमोद वाकोडे, संदीप आवारे, राजेश ताथोड, डॉ. महेश खोट्टे, राजेश काटे,निलेश जवकार,स्वप्नील सुरे, सागर गलास्कार, पाथरीकर, अजय गावंडे, सचिन थाटे, विनोद सगणे, शिवा दिंडोकार, योगेश जायले, सुरज शेंडोकार,  विठ्ठल वाघोडे,किशोर पाटील खुमकर, राजेश गावंडे,विक्की खुमकर यांच्यासह शेकडो समर्थक उपस्थित होते.

अनिल गावंडे हे अकोला जिल्ह्यातील हिवरखेड या गावचे मूळ रहिवासी असून गेली दोन दशके सामाजिक कार्यात आहेत. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा घेऊन ते सामाजिक जीवनात उतरले. मा.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली मराठा सेवा संघाची युवक आघाडी असलेल्या  संभाजी ब्रिगेडपासून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली. संभाजी ब्रिगेडच्या स्थापनेपासून ते या संघटनेत सक्रिय होते. तरुणाईला नवी दिशा देणारे अनेक उपक्रम त्यांनी अकोला जिल्ह्यात राबवले.  यासोबतच त्यांनी मा. श्याम मानव यांच्या नेतृत्वाखाली अंधश्रद्धा निर्मूलन समितीतही अनेक वर्षे काम केले. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी लोकजागर मंच या संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी आजवर अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत.

शेती प्रश्नाबद्दल काम करण्याला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिलं आहे. त्यामुळेच त्यांनी प्रसिद्ध शेतकरी आंदोलक आणि विचारवंत अमर हबीब यांच्या प्रेरणे तुन शेतकरी विरोधी कायदे संपविण्यासाठी उभे राहिलेल्या किसानपुत्र आंदोलनातही ते सक्रिय आहेत. या आंदोलनाचे पहिले शिबीर त्यांनीच मुंबईत आयोजित केले होते. शेतकरी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्याला अन्य उत्पनांची जोड त्यांना मिळावी म्हणून त्यांनी कृषी आधारित उद्योगांची उभारणी करण्यास प्राधान्य दिलं आहे. लोकजागर मंचाच्या वतीने अकोला जिल्ह्यात एक दूध डेअरी उभी केली जात असून 50 हजार लिटर प्रति दिन क्षमतेची ही डेअरी असेल. लोकजागर महिला बचत गटाच्या माध्यमातून लघुउद्योग उभे करण्यात आले असून येथे चिक्की, मशरूम पापड, घरगुती मसाले यांची निर्मिती केली जात आहे.

ग्रामीण भागातील तरुण तरुनीना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि त्यांना संदर्भसाठी उपयुक्त पुस्तके मिळावीत म्हणून अकोला जिल्ह्यात 4 ठिकाणी मोफत अभ्यासिका आणि वाचनालय उघडण्यात आले आहेत.

अनिल गावंडे यांच्या पुढाकाराने मागेल त्याला शेतरस्ता ही योजना लोकजागर मंच ने राबविली. या अंतर्गत अनेक गावातील शेतांमध्ये लोक सहभागातून रस्ते बांधण्यात आले.रस्त्यावरील खड्डे हा नेहमीच डोकेदुखीचा गँभिर प्रश्न असतो..मात्र यासाठी सरकार दरबारी खेटे न घालता स्वखर्चाने अनिल गावंडे यांनी तेल्हारा ते अकोट या 40 किमी रस्त्यावरील खड्डे  बुजवले. खड्डे बुजाव- जान बचाव ही  लोक चळवळ त्यांनी यासाठी उभी केली.

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड तेल्हारा हिवरखेड बेलखेड या गावांमध्ये  मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करूनच ते थांबले नाहीत तर या शिबिरात डॉक्टरानी सुचविलेली सर्व औषधे मोफत मिळतील अशी व्यवस्थाही त्यांनी उभी केली. विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजन करतानाच त्यांनी महिलांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले. यात 2 हजारहुन अधिक महिला सहभागी झाल्या.

31 डिसेंबरला तरुणाई मद्यधुंद होऊन नववर्षाचे स्वागत करते. ही कुप्रथा संपविण्यासाठी दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री दूध पार्टीचे आयोजन ही लोकजागरतर्फे केलं जाते. याला तरुणाई आता मोठ्या संख्येने हजेरी लावू लागली आहे. शिवसेनेत प्रवेश करून तरुणाई च्या विविध समस्या, रोजगार, रोजगाराभिमुख उद्योग निर्मिती, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्न यांच्या निर्मूलनासाठी काम करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.

अकोला जिल्ह्यात हे काम सुरू असतानाच ते गेली 15 वर्षेहून अधिक काळ मुंबईतही व्यवसाया निमित्त सक्रिय आहेत. त्यांच्या कामाची व्याप्ती कार्पोरेट क्षेत्रातही आहे. ते विविध कंपन्याचे प्रकल्प अंमलबजावणी आणि आखणी विषयक सल्लागार आहेत. या निमित्ताने त्यांना कार्पोरेट क्षेत्र आणि मंत्रालयातील विविध विकास कामे व  योजनांच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करणे, या योजनांची आखणी आणि अमंलबजावणीतील अडचणी यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. राज्याचे प्रशासन आणि राजकारण यांच्यातील घडामोडीशी ते जवळून परिचित आहेत. त्यामुळं त्यांच्या सारख्या प्रशासनाची जाण आणि ग्रामीण समस्यांचे ज्ञान असलेल्या लोकनेतृत्वाचे येण्याने ग्रामीण भागात विशेषतः विदर्भात शिवसेना भक्कम होण्यास हातभारच लागणार आहे.

Previous Post

तेल्हारा येथे भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंती दिनी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

Next Post

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Akola

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (पीएम-केएमडीवाय) संपूर्ण देशात सुरु

Akot

अकोट ग्रामीण रुग्णालयाचा भोगंळ कारभार, पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या भेटीत गंभीर प्रकार चव्हाट्यावर

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.