तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा येथील स्थानिक साई मंदिर परिसरात राहणारी सहा वर्षीय चिमुकली पाथर्डी येथील विद्रुपा नदीच्या काठावर एकटीच सापडल्याने एकच खळबळ उडाल्याने जनतेमध्ये अपहरण की हे नरबळीचे प्रकरण होते याबाबत तर्क वितर्क लावण्यात येत आहेत.
विश्वानिय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील साई मंदिर परिसरात राहणारी ८ वर्षीय चिमुकली आज सायंकाळ पासून घरून बेपत्ता झाली होती.सदर चिमुकली सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान वडिलांसोबत मार्केट मध्ये शालेय सामान घेऊन घरी सात वाजता वडिलांनी तिला सोडले होते मात्र त्यानंतर ती घरून बेपत्ता असल्याने घरच्यांनी तिचा शोध घेणे सुरू केला असता जवळपास ८.३० वाजेच्या दरम्यान त्यांची मुलगी पाथर्डी येथे असल्याचा फोन तिच्या वडिलांना आला.त्यानंतर तिच्या वडिलांनी पाथर्डी येथे जाऊन तिला ताब्यात घेतले त्यानंतर तेल्हारा पोलिस स्टेशन गाठून या बाबत सांगितले.
मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर मुलगी ही पाथर्डी येथील विद्रुपा नदीच्या पुलावर पाथर्डी व मुंडगाव येथील युवकांना एकटी दिसल्याने सदर युवकांनी तिला घेऊन पाथर्डी येथील पोलीस पाटील यांना अवगत केले त्यांनी मुलीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तेल्हारा येथील असल्याचे समजले याबाबत तेल्हारा पोलिसांना अवगत करून घरच्यांना सांगितले.मुलीच्या म्हणण्या नुसार ज्या व्यक्तीने तिला शहरातून पाथर्डी येथील नदी वर नेऊन तिला आंघोळ घातली सदर इसम आंघोळ करीत असताना सदर चिमुकलीने तेथून पळ काढला पुलाच्या वर आल्यानंतर सदर युवकांना ती दिसल्याने त्यांनी विचारपूस करीत असताना सदर चिमुकलीला घेऊन जाणाऱ्या इसमाने तेथून पळ काढला.सदर त्या ठिकाणावरून पळ काढणारा आणि त्या चिमुकलीला घेऊन जाणार तो इसम कोण याचा तपास व सदर प्रकार हा अपहरणाचा होता की नरबळीचा याचा तपास ठाणेदार विकास देवरे व त्यांची टीम करीत आहे.व याबाबत तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.