अकोला : महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडून अधिग्रहित करण्यात आलेल्या शेतजमीनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने गत अनेक वर्षांपासून शासनदरबारी लढा देणाºया सहा शेतकऱ्यांनी सोमवारी येथील अप्पर जिल्हाधिकाºयांच्या कक्षातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना दुपारी घडली.
विष प्राशन केलेल्या शेतकºयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सद्या उपचार सुरु आहेत. बाळापूर तालुक्यातील चार व कान्हेरी येथील दोन असे चार शेतकरी सोमवारी दुपारी अप्पर जिल्हाधिकारी लोणकर यांना भेटावयास गेले होते. शासनाने अधिग्रहित केलेल्या जमीनीचा मोबदला कमी मिळाल्याबाबत त्यांनी लोणकर यांना सांगितले. परंतु, लोणकर यांनी मोबदला वाढवून देण्यासंदर्भात असमर्थता दर्शविल्यानंतर सहा शेतकºयांनी सोबत आणलेले किटकनाशक प्राशन केले. तेथे उपस्थित कर्मचाºयांनी या सहा शेतकºयांना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : जम्मू-काश्मीर: जाणून घ्या कलम ‘३५ अ’ आणि कलम ‘३७०’
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola