• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

हिवरखेडात राज्यमार्गाच्या खड्डयांचे “बेशरम” च्या फुलांनी पूजन,आमदार भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारिपचे अनोखे आंदोलन

Editor by Editor
May 29, 2020
in Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
हिवरखेडात राज्यमार्गाच्या खड्डयांचे “बेशरम” च्या फुलांनी पूजन,आमदार भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारिपचे अनोखे आंदोलन
11
SHARES
566
VIEWS
FBWhatsappTelegram

* समर्थकानी केले वृक्षारोपण आणि फळवाटप

हिवरखेड (धीरज बजाज)-राजकीय परंपरा पाहता कोण्या मोठ्या लोकप्रतिनिधीचा वाढदिवस असला तर संबंधित लोकप्रतिनिधीचे समर्थक पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक जनता त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्याची प्रथा चालत आलेली आहे. परंतु अकोट विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांसह विरोधकांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार समर्थकांनी महात्मा गांधी अस्थिस्मारक सदाशिव संस्थान येथे वृक्षारोपण आणि रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम राबविला. यावेळी भाजपाचे दिलीप नाठे, रमेश दूतोंडे, अनिल कराळे, बजंरग तिडके, रवीभाऊ दवे, किरण सेदानी, रवी मानकर, मोनू राठी, विरेंद्र येऊल, अशोक कराळे, केशव कोरडे, बाळासाहेब नेरकर, गोवर्धन गांवडे इत्यादी उपस्थित होते.

मात्र दुसरीकडे भारिप बहुजन महासंघ तर्फे आकोट हिवरखेड सह अनेक रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून आमदारांच्या वाढदिवशी हिवरखेड- अकोट रोडवरील खड्ड्यांचे बेशरमच्या फुलांनी पूजन करून बेशरम चे रोपटे लावले तसेच या रस्त्यामुळे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अनेक जणांच्या आत्म्यांना शांती मिळण्याकरिता श्रद्धांजली सभा आयोजित केली होती. त्यामध्ये मौन पाळून मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या निषेध कार्यक्रमाला भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका अध्यक्ष संदीप इंगळे, जि. प. चे माजी उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, माजी तालुका अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, माजी उपसभापती मधुकरराव पोके, तालुका उपाध्यक्ष हिफाजत खा सर्कल अध्यक्ष रवींद्र वाकोडे, प्रदीप पाटील, अजीज खा जमीर खा, नरेश बांगर, शांताराम कवळकार, जाकीर खा, सुखदेव भगत, मनोज भगत, सै मोहसीन, मनोहर ताडे, सुशील इंगळे, लड्डुभाई, युसुफ खा यांच्या सह असंख्य नागरिक उपस्थित होते.
अकोट मतदार संघाच्या अनेक रस्त्यांची अनेक वर्षांपासून प्रचंड प्रमाणात दुरावस्था झालेली असून अनेक लोकप्रतिनिधी या समस्यांवर सपशेल अपयशी ठरलेले होते हे विशेष. परंतु मागील निवडणुकीत दर्यापूर मतदारसंघाचा कायापालट आम्ही केलेला आहे आणि आता अकोट मतदारसंघाचा कायापालट करू असे आश्वासन देऊन निवडून आलेल्या आमदार भारसाकळे यांची आश्वासने पोकळ ठरल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी 51 कोटींची मंजुरात असलेले रस्त्याचे काम संथगतीने आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्यामुळे प्रमुख रस्त्याच्या दर्जेदार दुरुस्तीच्या मागणीसाठी शांततामय मार्गाने आणि कायद्याच्या चौकटीत राहून हिवरखेड येथून रस्ता ग्रस्त संघर्ष समितीने आवाज उठविला होता. त्यांना प्रशासनामार्फत लिखित आश्वासन मिळाल्यानंतर ही अनेक आश्‍वासनांची पूर्तता करण्यात आली नाही. उलट राजकीय दबावापोटी पोलिसांनी रस्ता ग्रस्त संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांना नोटिसेस बजावल्या होत्या. अशी चर्चा सुद्धा दबक्या आवाजात नागरिकांमध्ये सुरू आहे.आमदारांच्या वाढदिवशी सकारात्मक आणि नकारात्मक रीत्या साजरा झालेल्या कार्यक्रमांमुळे मतदारसंघातील रस्त्यांचा मुद्दा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे एवढे मात्र निश्चित…

 

Previous Post

अकोट मतदारसंघाच्या आमदारांचा वाढदिवस खड्यांमध्ये “बेशरम” चे झाड लावून केला साजरा

Next Post

मायभूमीच्या सेवेसाठी लोकजागर मंच सदैव आपल्या सोबत आहे – मा. अनिल गावंडे

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Anil Gavande

मायभूमीच्या सेवेसाठी लोकजागर मंच सदैव आपल्या सोबत आहे - मा. अनिल गावंडे

अकोट येथे महाविद्यालयीन निवडणूक संदर्भात युवासेनेची बैठक संपन्न

अकोट येथे महाविद्यालयीन निवडणूक संदर्भात युवासेनेची बैठक संपन्न

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.