हिवरखेड (दिपक रेळे) : हिवरखेड येथील तेल्हारा रोडवर स्थित पत्रकार भवन हिवरखेड येथे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक दिनांक 28 जुलै रोजी संपन्न झाली. सदर बैठकीत संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला सोबतच भविष्यकालीन दृष्टिकोन समोर ठेवून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सांगोपांग पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकाराची भूमिका बजावताना शोषित वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सदैव तत्पर राहील अशी ग्वाही सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच भविष्यात अनेक सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बैठक पार पडल्यावर सर्व पत्रकार बांधवांनी पत्रकार भवनाच्या परिसरात श्रमदान करून परिसर स्वच्छ केला.
सदर बैठकीला अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे राजेश पांडव, संदीप इंगळे, धिरज बजाज, अर्जुन खिरोडकार, जितेश कारिया, सूरज चौबे, अनिल कवळकार, राहुल गिर्हे, दीपक कवळकार, जावेद खान पठाण, यांच्यासह अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
अधिक वाचा : अवर अकोला न्युज इम्पॅक्ट- तेल्हारा डेपोतील बस गळती प्रकरनी वाहन परीक्षक निलंबीत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola