अकोला :
* पालकमंत्री यांनी स्वत: जनतेकडे जाऊन स्विकारल्या तक्रारी
* सामुहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीतांना निर्देश
* प्राप्त नविन तक्रारींचा 15 दिवसांच्या आत निपटरा करण्याचे निर्देश
* जुन्या तक्रारींवर करण्यात आलेल्या कार्यवाहीचा घेतला आढावा
* संबधीत विभागाच्या अधिका-यांसमोर समक्ष तक्रारकर्त्यांची तक्रार जाणून
घेवून केलेल्या कार्यवाहीचा घेतला आढावा
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 223 तक्रारी प्राप्त झाल्या. या सभेच्या माध्यमातून तक्रारदारांना दिलासा मिळाला असून अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी स्वत: लोकांकडे जाऊन त्यांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही त्यांना दिला.
जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोद गांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मनपा आयुक्त संजय कापडणीस, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सामुहिक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन संबंधीत विभागाच्या अधिका-यांना तक्रारीवर कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिले. जम्मु काश्मिर येथे शहीद झालेल्या अकोला येथील आनंद गवई व मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथील संजु सुरेश खंडारे या शहीदांच्या वारसांना शासनाकडुन देण्यात येणारे जमिनीबाबत पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी ग्राम विकास मंत्रालयाचे सचिव यांच्याशी दुरध्वनी व्दारे चर्चा केली त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा प्रस्ताव गा्रम विकास सचिवांकडे त्वरीत पाठवावा असे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत.
जात पडताळणी विभागाकडुन 12 वी नंतर उच्च शिक्षणांसाठी प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांचे जात पडताळणी संबंधी प्रकरणे त्रुटी अभावी परत करण्यात आली आहे. पुरेसा वेळ नसल्या मुळे विदयार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहे. याबाबतची तक्रार सुमारे 100 च्या वर विदयार्थ्यांनी आज पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्याकडे केली त्यावर संबंधीत विभागाला विदयार्थ्यांची शैक्षणिक हानी होणार नाही यासाठी जात पडताळणीचे प्रकरणे त्वरीत मार्गी लावावे असे निर्देश पालकमंत्री यांनी दिलेत. याबाबत संबंधीत विभागाला उदया प्रत्यक्ष भेट देणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.
कौलखेड जहागीर येथील सरपंच संगीता तायडे , उपसरपंच विनायक तायडे तसेच गावकरी प्रदिप तायडे व मनोज तायडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 25 गावक-यांनी कौलखेड जहागीर परिसरात दुष्काळ परिस्थीती तसेच शेतक-यांनी पिक विमा काढला असुन कौलखेड जहागीर गावाला कापुस व सोयाबीन पिकाच्या पिक विम्याच्या लाभापासून वंचित ठेवले असल्याचे निवेदन दिले. यावर चौकशी करून सकारात्मक कार्यवाही करण्याचे ग्वाही पालकमंत्री यांनी दिली. बार्शिटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर ते चिखलगाव पर्यंतचा शेतरस्ता अर्धवट काम केल्यामुळे चिखलमय झाला असुन वाहतुक करण्यात अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार सिंदखेड मोरेश्वर गावक-यांनी दिली. यावर योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधीतांना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिलेत.
यावेळी व्यक्तीगत व सामुहीक तक्रारी प्राप्त् झाल्यात. विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग –83 तक्रारी, पोलीस विभाग—16, जिल्हा परिषद– 44, मनपा-25, विद्युत विभाग –11, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था-06, भूमी अभिलेख – 05, कृषी विभाग –06, जिल्हा अग्रणी बँक –04,एस.टी. महामंडळ-03, पाटबंधारे विभाग-01, जिल्हा शल्य चिकित्सक-04, पाटबंधारे विभाग- 01, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 01, जिल्हा मार्केटिंग अधिकारी- 02, सार्वजनिक बांधकाम- 02, सहाय्यक आयुक्त कामगार कल्याण-01, जात पडताळणी समिती-02, आदिवासी विभाग- 01, समाज कल्याण विभाग- 01, म्हाडा- 01, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी -01, उपवनसंरक्षण -01, पोस्ट ऑफिस- 02, अशा एकुण नविन 223 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या.
पालकमंत्री यांनी सर्वप्रथम सहकार विभागाच्या जुन्या तक्रारी स्विकारल्या यात पीक विमा , पिक कर्ज वाटप आदी बाबतच्या तक्रारींचा समावेश होता. यावेळी जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे , जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक ताराणीया यांची उपस्थिती होती.
त्यानंतर महसुल , जिल्हा परिषद, पोलीस विभाग, महानगरपालीका व इतर विभाग अशा विभागनिहाय तक्रारी स्विकारल्या. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारकर्त्यांचे म्हणने ऐकून घेत अधिकाऱ्यांना तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना केली. आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण नविन 223 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी करून विभागवार आढावा घेतला.
या तक्रार निवारण दिनाला उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार , अभयसिंग मोहिते, रमेश पवार, रामदास सिध्दभट्टी, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अतुल तराणीया , जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अरुण वाघमारे, तहसिलदार गटविकास अधिकारी तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोला जिल्ह्यातील तामशी येथील सेलेब्रिटी ‘चाँद’ बोकड, खरेदीसाठी 10 लाखांवर बोली
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola