अकोला (प्रतिनिधी) : विद्यार्थी हितार्थी राज्यपालांना दिले निवेदन
गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेल्या महाविद्यालयीन खुल्या निवडणुका अखेर सुरू झाल्या.या निवडणुकांच्या माध्यमातून पुर्वी अनेक नेते उदयास आले होते. यामुळे या महाविद्यालईन निवडणुकांना मोठे महत्व दिले जाते. यामुळे अनेक विद्यार्थी तसेच विद्यार्थी संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही वर्षांपूर्वी महाविद्यालयीन निवडुकांनामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती पसरली होती यांमध्ये अपहरण, खुन असे प्रकार वाढले होते त्यामुळे या निवडनुकांवर बंदी घालण्यात आली होती. आता ह्या निवडणुकांवरील बंदी हटवून पुन्हा खुल्या निवडणुका सुरू होत असतांना पुन्हा गुन्हेगारी प्रकार घडु नये यासाठी विद्यार्थी उमेदवारांचे चरित्र्य प्रमाणपत्राची सक्ती करा असे मागणी काॅग्रस चे अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी राज्यपालांकडे निवेदना मार्फत केली.
नियम व अटी मध्ये बसल्यास मी सुद्धा उमेदवार
नियम व अटींच्या चौकटीत बसल्यास मी सुद्धा उमेदवार असल्याचे अंकुश अनिल गावंडे यांनी सांगितले अंकुश अनिल गावंडे हे उच्चशिक्षित असुन ते विधी महाविद्यालय अकोला येथे शिक्षण घेत आहेत.लाॅच्या विद्यार्थींच्या पुर्ण:परीक्षा तसेच ईंजिनीयरींग च्या पेपरफुटी प्रकरण निकाली लावुन अनेक विद्यार्थांना न्याय मिळवून दिला आहे.अकोला विधी महाविद्यालय अकोला येथुन अध्यक्ष पदासाठी ते उमेदवारी लाढवतील असे त्यांनी सांगितले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola