अकोट (देवानंद खिरकर) : अकोट तालुक्यातील कुटासा परीसरातील शेतकऱ्यांनी अल्पशा पाऊसात आपली पेरणी आटोपली. अनेक शेतकऱ्यांनी कपाशी, मुंग, तुर, सोयाबीन बियान्याची लागवड केली. ही पिके थोडी थोडी वाढत असताना, वन्य प्राणी शेतात धुमाकुळ घालुन पीके फस्त करत आहेत. या वन्य प्राण्यांच्या धुमाकुळ मुळे येथील शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
या वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांवर आज दुबार पेरणीचे संकट आले आहे. या परीसरात रानडुक्कर, हरीण, माकडाच्या कळपांनी धुमाकुळ घातला आहे. आधीच पाउसाने दांडी मारल्यामुळे, आधीच उगवलेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. जे पिके वाढु लागली आहेत त्यांना वन्य प्राणी खात आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. व आता या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा अशी मागणी या परीसरातील शेतकरी वर्ग करीत आहेत.
अधिक वाचा : मराठा महासंघ अकोला तालुका युवक अध्यक्ष पदी ऋषिकेश थोरात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola