• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, February 17, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘वंचित’ मध्ये उभी फूट ? ; लक्ष्मण मानेंचे प्रकाश आंबेडकरांवर शरसंधान

adil by adil
May 14, 2020
in Featured, अकोला, राज्य
Reading Time: 1 min read
77 1
1
तेल्हारा येथे बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा 4 एप्रिल ला
11
SHARES
554
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : मुंबई – लोकसभा निवडणुकीत लक्षणीय कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्वतंत्र स्थान निर्माण करू पाहणाऱ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच फूट पडत असल्याचे संकेत मिळत आहे. आघाडीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे लोक घुसले असून वंचित बहुजन आघाडी आता वंचितांचा राहिलेली नाही, असा खळबळजनक आरोप करत वंचित बहुजन आघाडीतून फारकत घेतलेले वंचितचे महत्त्वाचे नेते लक्ष्मण माने यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीकास्त्र सोडत वंचितमध्ये उभी फूट पडत असल्याचे अधोरेखित केले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्या कामाची पद्धत पाहता आपण त्यांच्यासोबत काम करू शकत नसल्याचे सांगताना, पक्षात संघाच्या लोकांना स्थान देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनीच आता राजीनामा द्यावा, अशी मागणी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माने यांनी केली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

वंचितचे सांगलीतून लोकसभेसाठी उभे राहिलेले गोपीचंद पडळकर हे आरएसएसचे कार्यकर्ते आहेत. त्यांना प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी दिली. तसेच आमचे मत न घेताच त्यांनी त्यांना पक्षाचे प्रवक्ते केले, असा आरोप माने यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांना आम्हीच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष केले, मात्र त्याच्या कामाची पद्धत चुकीची असल्याने आपण त्यांच्यापासून दूर होत असल्याचे माने यांनी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळेच वंचितवर भाजपची बी टीम असल्याचे आरोप होत असतात. आंबेडकर असे वागल्यामुळेच हे आरोप होत असल्याचे माने म्हणाले. मी कट्टर आंबेडकरवादी असून कधीही आरएसएस, भाजप किंवा शिवसेनेचे समर्थन करू शकणार नाही, असे म्हणत माने यांनी आंबेडकर यांना टोला लगावला. प्रकाश आंबेडकर यांच्या सांगण्यावरूनच आपण प्रवक्तेपदासाठी पडळकरांचे नाव सुचवून त्यांना अनुमोदन दिल्याचे माने म्हणाले.

मानेंचा प्रवक्तेपदाचा राजीनामा

दरम्यान, आपण प्रवक्तेपदाचा राजीनामा आंबेडकर यांच्याकडे सोपवला असून आपण आंबेडकरांबरोबर काम करू शकत नाही, असा उल्लेख असलेले पत्र आंबेडकर यांना पाठवल्याचे माने म्हणाले. वंचितचे बहुसंख्य कार्यकर्ते आपल्या बरोबर असल्याचा दावाही माने यांनी केला आहे.

लक्ष्मन माने राष्ट्रवादीचे हस्तक- पडळकर

लक्ष्मण माने हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हस्तक असल्याचा थेट आरोप गोपीचंद पडळकर यांनी मानेंवर केला आहे. माने यांचे म्हणणे स्वीकारण्याजोगे नसून त्यांचे दुखणे काही वेगळेच आहे असे पडळकर म्हणाले. पक्षाच्या प्रवक्तेपदासाठी माने यांनीच आपले नाव सूचवले, तसेच अनुमोदनही त्यांनीच दिले, याकडेही पडळकर यांनी लक्ष्य वेधले. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर याची प्रतिक्रिया मात्र कळू शकलेली नाही.

अधिक वाचा : गाडेगाव रस्त्याच्या दयनीय अवस्थे बाबत शिवसेनेसह गाडेगावकर संतप्त आंदोलनाचा दिला इशारा

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Tags: अकोला
Previous Post

गाडेगाव रस्त्याच्या दयनीय अवस्थे बाबत शिवसेनेसह गाडेगावकर संतप्त आंदोलनाचा दिला इशारा

Next Post

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर ; विकास दर ७ टक्के राहणार

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर ; विकास दर ७ टक्के राहणार

आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर ; विकास दर ७ टक्के राहणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ जिल्हयातील 1 लाख 13 हजार शेतकरी कुंटूबाना या योजनेचा लाभ मिळणार-जिल्हाधिकारी पापळकर

अकोला पॅटर्न-एक विद्यार्थी - एक वृक्ष - विद्यार्थ्‍यांमध्‍ये बालवयातच वृक्षप्रेम व पर्यावरण विषयक जाणीव रुजवावी- जिल्‍हा‍धिकारी जितेंद्र पापळकर

Comments 1

  1. Pingback: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर ; विकास दर ७ टक्के राहणार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.