अडगांव बु (दिपक रेळे) : नागपूर – देशातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य मिळावे व HT Bt कपाशीच्या वाणाच्या चाचण्या व प्रयोग सुरू करण्याविषयी दिनांक दहा जून अकोली जहागीर येथून सुरू झालेल्या आंदोलनाने महाराष्ट्रभर पेट घेतला आहे या आंदोलनाचे हरियाणा मध्ये सुद्धा पडसाद उमटत आहेत. दिनांक पाच जुलाई ला हरियाणामध्ये हे आंदोलन पेटण्याचे चिन्हे दिसत आहेत.
भारत भर पसरत असलेल्या या आंदोलनाच्या पाश्वभूमी वर शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांचे पत्र रस्ते व परिवहन मंत्री तसेच विदर्भाचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे जेष्ठ मंत्री श्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन पत्र पोहचविले. शिष्टमंडळाच्या भेटीत सकारात्मक चर्चा होऊन पर्यावरण मंत्री श्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दिल्ली येथे चर्चा घडवून आणता येईल अशे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ते ललित पाटील बाहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष दिनेश शर्मा, अमरावती जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख राजाभाऊ पुसदेकर, शेतकरी संघटनेच्या माहिती व तंत्रज्ञान आघाडी चे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कौठकर, व विजय नेव्हल उपस्थित होते.
अधिक वाचा : अकोट तालुक्यातील दोन पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प, बांधकाम विभागाचा कारभार चव्हाट्यावर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola