दिवसेंदिवस वाढत असलेल्या मोबाइल आणि टॅबलेट्सच्या अतिवापरामुळे आपल्या शरीराची संरचना बदलत आहे. ऑस्ट्रेलियातील सनशाइन कोस्ट विश्वविद्यालामध्ये झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली. तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या गॅझेट्सवर अधिक वेळ घालवल्यामुळे डोक्याच्या मागच्या बाजूला एक अतिरिक्त हाड वाढत आहे. त्यामुळे याला टेक्स्ट नेक असे नाव देण्यात आले असून याचा आकार 2.6 सेमी. पर्यंत आढळला आहे. तसेच, मोबाइल-टॅबलेटचा अधिक वापर करणाऱ्या एक हजार लोकांचे डोके स्कॅन केल्यानंतर याची खात्री करण्यात आली आहे.
18-30 वर्ष वय असणाऱ्या लोकांमध्ये आढळले टेक्स्ट नेक
तज्ज्ञांनी याची सत्यता जाणून घेण्यासाठी 18 ते 86 वर्ष वय असणाऱ्या लोकांना या संशोधनात समावेश केला होता. या संशोधन टेक्स्ट नेकची समस्या 18-30 वयोगटातील लोकांनी अधिक जणावते असे स्पष्ट झाले आहे. तसेच, लहान मुले आणि तरूणांमध्ये पाठीचा कोण बदलणे आणि मानेला त्रास होणे या सारख्या समस्या उद्वभवत आहेत.
मानेच्या मांसपेशीला आधार देते टेक्स्ट नेक
संशोधक डॉ. डेविड सहरनुसार, मानेमध्ये टोकदार हाड विकसित होण्याचे प्रकार मागील एका दशकात पाहायला मिळत आहेत. यापूर्वी असे काही नव्हते. मानेद्वारे पाठीकडे येणाऱ्या मांसपेशीचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. त्यासोबतच आपल्या डोक्याचे वजन जवळपास पाच किलो असते आणि याचा भारसुद्धा या मांसपेशिवर पडतो. त्यामुळे हा भार कमी करण्यासाठी मानेच्या मागच्या बाजूस एक नवीन हाड विकसित होत आहे.
बदलत आहे मुलांच्या कण्याचा आकार
डॉ. जेम्स कार्टरनुसार, वर्तमान काळात मुलांच्या पाठीच्या कण्याचा आकार बदलत आहे. त्यासोबतच मोबाइलचा अतिवापर केल्यामुळे त्यांना बॅकपेन, डोकेदुखी, मानेसहित खांद्यामध्ये त्रास होणे यासारख्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच, यासारख्या समस्या असणारे अनेक लोक त्यांच्याकडे येतात. पण याचे मुळ कारण टेक्स्ट नेक आहे.
दर 12 मिनीटाला एकदा फोन चेक करतो व्यक्ती
प्रत्येक व्यक्ती सरासरी दर 12 मिनीटाला आपला स्मार्टफोन चेक करतो. एका आठवड्यात सुमारे 24 तास फोन वापर करताना घालवतो. तसेच, 5 पैकी एक व्यक्ती संपूर्ण आठवड्यात 40 तास मोबाइलचा वापर करतो. त्यामुळे फोनचे वाढते प्रमाण येणाऱ्या काळात भयानक रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिक वाचा : ओम बिर्ला परफेक्ट मॅन, आठवलेंच्या काव्यात्मक शुभेच्छा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola