अकोट(प्रतिनिधी)- अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने अकोट विभागात अवैध धंदे वाल्यावर कारवाईचा धुमधडाका लावला असून आज पोपटखेड येथील गावरान दारूचा अड्डा उध्वस्त करून मुद्देमालसह आरोपीला अटक करण्यात आलि आहे.
आज दुपारी गुप्त माहितीवरून अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे यांचे पथकाने पोपटखेड येथे जाऊन गावरान दारूच्या रनिंग भट्टीवर रेड केली असता सडके मोह साठा 150 किलो किंमत 15000 रुपये ,18 लिटर गावरान दारू 1800 रुपये ,दारू पडण्याचा नळ्या 02 नग किंमत 100 रुपये,स्टील गुंड किंमत 100 रुपये असा एकूण 17000 रुपये चा मुद्देमाल सह आरोपी नामे गजानन शंकरराव सलपेकर वय 45 वर्ष , रा पोपट खेड ता अकोट जि अकोला हा अवैध दारू पाडताना मिळून आला आहे, सदर आरोपी याचे विरुद्ध पोलीस स्टेशन अकोट ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात येत आहे सदर कारवाई मा sdpo सुनील सोनवणे सा यांचे मार्गदर्शन खाली राजू खरचे, ना पो का राजेश्वर सोनवणे ,सुभाष वाघ ,अनिल लापूरकर यांनी केली