नवी दिल्ली : पती आणि पत्नी विभक्त झाल्यास पतीच्या एकूण पगारातील 30 टक्के भाग पत्नीला पोटगीच्या स्वरूपात देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. पोटगीची रक्कम देण्याचे सूत्र निश्चित असून पतीवर कुटुंबातील आणखी कुणी अवलंबून नसल्यास पतीच्या पगारातील दोन हिस्से पतीकडे राहतील, तर एक हिस्सा पत्नीला द्यावा लागेल असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात एका महिलेने पोटगीसाठी ठरविण्यात आलेली रक्कम मिळत नसल्याबाबत याचिका दाखल केली होती. 7 मे 2006 या दिवशी या महिलेचा विवाह झाला होता. तिचा पती सीआयएसएफमध्ये निरीक्षक आहे. 15 ऑक्टोबर 2006 मध्ये ते एकमेकांपासून वेगळे झाले. त्यानंतर पत्नीने पोटगीसाठी अर्ज केला. 21 फेब्रुवारी 2008 ला पत्नीला पतीने आपल्या एकूण पगारातील 30 टक्के भाग द्यावा, असे निर्देश न्यायालयाने दिले. या निर्णयाला पतीने आव्हान दिल्यानंतर न्यायालयाने पोटगीच्या रकमेत घट करत ती 15 टक्के केली. या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर 21 फेब्रुवारी 2008 रोजी देण्यात आलेला आदेश कायम ठेवण्याचा निर्णय न्यायमूर्ती संजीव सचदेव यांनी दिला.
अधिक वाचा : मदत न करता अपघाताचे चित्रीकरण करणाऱ्यांवर आता होणार कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola