अकोट(प्रतिनिधी)- सुसंस्कार शिबिरा मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्री. प्रा. संजय तिडके सर यांनीं मुलांना समाजा मध्ये अंधश्रद्धा कशा प्रकारे फोफावत आहे यांचे उदाहरणे देऊन त्यावर काय उपाय योजना करायला पाहिजे याचे प्रात्यक्षिक सह समजावून सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा कोना संप्रदायाला देव धर्माला विरोध नसून त्याच्या भरवशावर बुआ बाजी करून लोकांन कडून पैसे घेऊन फसवनुक करणाऱ्या ना विरोध करणारे आहे. समाजातील बुआ बाजी ला कोणीही फसल्या जाऊ नये यासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन नेहमी सतर्क असले पाहिजे प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. त्यासाठी आपल्या सचोटीवर खरे खोटे पाळताळणे हे आपले कार्य आहे असा संदेश आपल्या मार्गदर्शना तुन दिला.
कार्यक्रमाला गजानन गजानन महाराज सेवा समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून रोहन बुंदेले, रीना वानखडे हे उपस्थित होते. सूत्र संचालन अमोल महाराज मेनकार तर आभार प्रदर्शन संजय राणे गुरुजी यांनी केले.
अधिक वाचा : सकल मराठा समाजाच्या वतीने वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola