तेल्हारा (प्रतिनिधी) : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाकारण्यात आले. यासाठी मुंबई येथे आझाद मैदानात जवळपास २५० विद्यार्थी रखरखत्या ऊन्हात आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाला तेल्हारा तालुका मराठा समाजाचा जाहीर पाठींबा असून मागण्या मान्य न झाल्यास मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल यासाठी तेल्हारा तहसीलदारांना निवेदन सादर गेल्या ३ वर्षांपासून मराठा समाज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शांततेने तीव्रपणे आंदोलने केली तरी या कुंभकरणाच्या झोपेत असेलेले हे सरकार फक्त आश्वासनाचे गाजर दाखवत आहे.
गेल्या नव्हेंबर महिन्यात आरक्षण देऊनही ते प्रकरण न्यायालय दाखल झाला तरी सरकार ने आरक्षण संदर्भात आपली बाजु मांडली नाही व तशेच वैद्यकीय विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू करण्यात आले नाही. यासाठी रखरखत्या उन्हात २५० च्या वर मराठा विद्यार्थी गेल्या कित्येक दिवसा पासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन करत आहे. तरी या सरकारला जाग येत नाही आहे. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तेल्हारा तालुका मराठा समाजाचा जाहीर पाठींबा असून मराठा समाजच्या विद्यार्थ्यांना वर होत असलेल्या अन्याय व आंदोलना दरम्यान झालेले व होत असलेले नुकसान यावर सरकारने ठोस उपाय न केल्यास तशेच सदर विद्यार्थ्यांना आरक्षण देऊन प्रवेश न मिळाल्यास व मराठा समाजाच्या कुठल्याही मागण्या मान्य न झाल्यास तेल्हारा तालुका मराठा समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडू व होणाऱ्या परीणामास फक्त सरकार जवाबदार राहील याची नोंद घ्यावी व मराठा समाजच्या संपूर्ण मागण्यांना कुठल्याही प्रकारचे तत्त्व व निकष न लावता पूर्ण करून मराठा समाजाला न्याय मिळून द्यावा यासाठी आज तेल्हारा तहसीलदारांना निवेदन सादर सदर निवेदनावर अनुप पा मार्के, विवेक खारोडे, अजय पा.गावंडे, अनंत सोनमाळे, रोशन अहेरकर, आशिष देशमुख, राजकुमार शेंडे, श्रीकांत पाथरीकर, सत्यशील सावरकर, अशोक नराजे, ऍड संदीप देशमुख, सतीश घुंगळ, भूषण पारस्कर, विठ्ठल वाघोडे, शांत नेमाडे, विक्की खुमकर, विनायक पाटील, राजेश खोंड, रविकांत रोडे, इत्यादी सह शेकडो मराठा कार्यकर्ते उपस्थित होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola