वाडेगाव (डॉ शेख चांद)– येथील पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या शेतशिवरात संजय महादेव लोखंडे, हे दि २९ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास त्यांच्या स्वताच्या बकऱ्या चारण्याकरीता गेले असता संध्याकाळी ६ वाजता बकऱ्या स्वाताहुन चरून घरी आल्या परंतु संजय लोखंडे घरी परत आलेच नाहीत म्हणुन त्यांच्या नातेवाईकांनी संजय लोखंडे यांचा शोधाशोध सुरू केली असता एका धब्याजवळ असलेल्या शेतात प्रेत आढळून आले आहे. हा मृत्यू उन्हामुळे झाल्याचे चर्चा सुरू होती. येथील हरिदास मानकर यांच्या शेतातील धुऱ्याचा पाडितात संजय लोखंडे वय ५२ यांचे प्रेत मिळाले. याबाबत घटनेची माहिताच मिळताच वाडेगाव पो चौकीचे सहायक पोलिस निरक्षक वैभव पाटील व हे का पो विनायक पवार, गणेश गावंडे हे घटनास्थळी जाऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणी करीता अकोला येथे रवाना केले. त्यांचा पश्चात तिन मुले व दोन मुली व पत्नी असा आप्त परिवार आहे. उष्मघातामुळे बळी गेल्याचे अंदाज वर्तविला जात आहे. पो स्टे बाळापूर येथे अकस्मात मृत्युची नोंद केली असुन तपास वाडेगाव बाळापूर पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : अकोला जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola