अकोला : काँग्रेसच्या ‘चौकीदार चोर है’ या जाहिरातीवर मध्यप्रदेशच्या संयुक्त मुख्य निवडणूक आयुक्तांनी बंदी घातली आहे. काँग्रेसकडून प्रसारित करण्यात येत असलेली ‘चौकीदार चौर है’ ही जाहिरात राज्य मीडिया प्रमाणन समितीने रद्द केली आहे. त्यामुळे या जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली आहे.
भाजपच्या ‘चौकीदार चोर है’ या जाहिरातीवर आक्षेप घेऊन या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली होती. ही जाहिरात बदनामकारक, आक्षेपार्ह आहे. भारत सरकारच्या मीडिया प्रमाणन समितीच्या परवानगीनेच ही जाहिरात प्रसारित केली जात आहे, अशी तक्रार भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी केली होती.
ही तक्रार आल्यानंतर मुख्य निवडणूक पदाधिकारी व्ही. एल. कांताराव यांनी जाहिरातीच्या प्रसारणावर बंदी घातली आहे. निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार काँग्रेसविरोधात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून या जाहिरातीवरून काँग्रेसला नोटीसही बजावण्यात आली आहे. तसेच ही जाहिरात कोणत्याही माध्यमातून प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
अधिक वाचा : मतदान करताना फेसबुक लाईव्ह, चौघांविरोधात गुन्हा