तेल्हारा(विशाल नांदोकार)- येथील श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात येते. यावर्षी युद्ध रामनवमी उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ‘प्रभू श्रीरामाच्या जयघोषात, तुतारी, टाळ-मृदंगाच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत बँड, भालदार-चोपदार, अब्दागिरी, छत्री, भगवे ध्वज अशा लवाजम्यासह भजनी मंडळी अत्यंत भक्तिभावाने पालखीत सहभागी झाले होते.
रामनवमी निमित्त शाहरातून निघालेली मिरवणूक श्री शिवाजी हायस्कूल येथून संत तुकाराम चौक, टावर चौक, प्रताप नगर, बजरंग चौक, संभाजी चौक, श्री शिवजी महाराज चौक, जून स्टैंड मार्गे ही मिरवणूक श्री शिवाजी शाळेत पोहचली.
मिरावणुकी मध्ये मुख्यतः खामगांव येथील मुलिंच्या डोरिवरच्या मल्ल खांबाने सर्वांचे लक्ष वेधुन घेतले तर, लाठी काठी, तलवारबाजी, यांनी मिरावणुकीची शोभा वाढविली, तर शबरीचे बोर खतना देखावा, राम लक्ष्मण सीता, हनुमान, यांचे देखावे मिरवणुकीचे आकर्षण ठरले. मिरवणूक मार्गात ठीकठिकानी चाहा, शरबत, पानी इत्यादीचे वाटप करण्यात आले, तसेच ठीक ठिकाणी राम लक्ष्मण सीता, हनुमान, तसेच जय बजरंग चौकाने संत गजानन महाराजांची झांकी नागरिकांचे लक्ष वेधुन घेत होती. मिरवणुकीमध्ये शहरात सर्वच भागातील तरुण मोठ्या उत्साहात सहभागी होऊन एकीचे प्रदर्शन कारित होते है उल्लेखनीय. यावेळी श्रीराम नवमी उत्सव समितीचे कार्यकर्ते, नागरिक, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.