वाडेगाव (डॉ शेख चांद): मागील माहिन्यापासून सर्वात मोठी पाणी टंचाई लक्षात घेता, ग्रामपंचायत कडून ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करण्याकरिता चोंढी धरणातून पाणी मागितले होते. ते पाणी ५० किलोमीटर निर्गुणा नदीद्वारे घेण्यात आले होते. हे पाणी नदीकाठी असलेल्या ग्रामस्थानी अडवणूक केली तर काही शेतकरी ग्रामस्थानी त्या येणाऱ्या पाण्यामध्ये मोटरपम टाकण्यात आले. तर वरून जोरात उन्हाळा तापत असल्याने नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणत पाणी झिरपत असल्यामुले येणारे पाणी मोठ्याने येत नसल्याचे चित्र आहे.
हे पाणी वाडेगाव येथील ग्रामस्थापर्यत पोहचवीन्याकरिता मोठ्या प्रमाणत प्रयत्न केले आहे. परंतु पाणी हे १० दिवसापासून पोहचले नसल्याने ग्रामस्थांची निराशा झाली आहे. हे पाणी वाडेगावत कधी पोहचणार असा प्रश्न पदाधिकारी यांना करीत असल्याचे चित्र आहे. एकीकडे तर ग्रामपंचायत कार्यालयावर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाण्याकरिता मोर्चे निघत आहेत .तरी पाण्याची समस्यां दूर होत नसल्याचे चित्र आहे .काही ग्रामस्थानी पाणी न भेटल्यास १५ एप्रिल पासून उपोषणाला बसणार असल्याचे निवेदना दिले आहे .तरी गावकऱ्यांना लवकर पाणी मिळावे याकरिता प्रशासनाने ठोस पाऊल उचलावे व पाणी समस्यां दूर करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थाकडून होत आहे.
अधिक वाचा : रस्त्यासाठी लोणसना ग्रामस्थांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola