तेल्हारा (प्रतिनिधी) : नगरपालिका निवडणुका होऊन अडीच वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा नागरिकांचा पाण्याचा प्रश्न न सुटल्याने आज शहरातील नागरिकांनी थेट जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष जयश्री गडकर यांना घेराव घालून आपल्या समस्या मांडून प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. शहरातील प्रभाग क्रमांक सहा मध्ये नागरिकांना उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाण्यासाठी नेहमीच वणवण भटकावे लागत असल्याने यावेळेस उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच येथील नागरिकांना पाण्याच्या प्रश्नाला सामोरे जाऊन त्रास सहन करावा लागत आहे.
पाण्याचा प्रश्न घेऊन नागरिक वेळोवेळी पदाधिकारी व प्रशासनाला याबाबत लेखी तसेच तोंडी अवगत करत आले आहेत . तरीसुद्धा तेल्हारा पालिकेकडून आत्तापर्यंत कुठलीही ठोस अशी उपाययोजना करण्यात न आल्याने तसेच रोजच्या त्रासाने वैतागलेल्या येथील महिलांनी व नागरिकांनी थेट नगराध्यक्ष जयश्री फुंडकर यांना आपल्या प्रभागात बोलून समस्यांचा पाढा त्यांच्यासमोर वारला नागरिकांनी केलेल्या प्रश्नांचा भडीमार यामुळे नगराध्यक्ष यांचे नाकी नऊ आले होते. नगरपालिका पदाधिकारी व प्रशासनाकडून दरवेळेस फक्त आश्वासनांची खैरात वाटून जनतेचे प्रश्न मात्र जैसे थे ठेवण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या आक्रोशाला आज नगराध्यक्ष तसेच नफा प्रशासनाला सामोरे जावे लागले. यावेळी प्रश्नांचा भडिमार मधून सुटण्यासाठी नगराध्यक्ष व नगरसेवक व प्रशासना नाणे आता सहित्याचे कारण पुढे करत नागरिकांच्या प्रश्नांना थांबते केले. गेली काही दिवसांपूर्वी लागलेली असताना पाण्याचा प्रश्न मात्र वर्षानुवर्षे चालत आला आहे. त्यामुळे टाळूवरचे लोणी खाण्याचे काम तेल्हारा नगर परिषद करीत असल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला.
यावेळी नगराध्यक्ष यांनी तुमच्या प्रभागासाठी पाण्याच्या टाकीची व्यवस्था केली असून लवकर समस्या सोडवण्यात येईल येईल असे सांगितले. मात्र हा प्रश्न नेहमीचं असून गेल्या कित्येक वर्षापासून फक्त आश्वासनांची खैरात कामांचा लेखाजोखा सांगण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात उपाययोजना अमलात येत नसल्याचा आरोप सुद्धा यावेळी नागरिकांनी केला तसेच यावेळी नागरिकांनी अजून काही महिने त्रास सहन करावा असा सल्ला सुद्धा देण्यात येऊन पाण्याच्या टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल असे सांगितले. जर पाण्याच्या टॅंकरने पाणी पुरवठा केल्या जात असणार तर नळयोजना कशासाठी आणि बिलाचा भरणा आम्ही का करावा असा प्रयत्न सुद्धा यावेळी उपस्थित करण्यात आला होता. या सर्व प्रकारावर नागरिकांच्या मते तेल्हारा नगरपालिका जनतेविषयी गंभीर नसल्याचे उपस्थित सुज्ञ नागरिकांनी बोलून दाखवले.
अधिक वाचा : एज्युविला चे विद्यार्थी स्वीप च्या माध्यमातून करणार पातूर बाळापूर तालुक्यात मतदारजागृती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola