अकोला (प्रतिनिधी)- होणार होणार म्हणून सर्वांचे लक्ष लागून असलेली काँग्रेसची अकोल्यातील उमेदवारी अखेर आज जाहीर झाली. काँग्रेसने उमेदवारीची माळ पुन्हा एकदा हिदायत पटेल यांच्या गळ्यात घातली आहे.
गेल्या निवडणुकीतही काँग्रेसने पटेल यांनाच उमेदवारी दिली होती. धोत्रे, पटेल आणि आंबेडकर या तिरंगी लढतीत धोत्रे यांनी प्रचंड मताधिक्याने बाजी मारली होती. परिणामी यावेळी काँग्रेसतर्फे उमेदवार बदलून दिला जाईल असे बोलले जात होते. डॉ अभय पाटील यांच्या रूपाने एक सशक्त पर्याय पक्षाला मिळूनही ही संधी नेत्यांना साधता आली नाही. काही स्थानिक नेत्यांची अंतर्गत गटबाजी अद्यापही थांबण्याचे नाव घेत नाही. अभय पाटलांना तांत्रिक अडचणीत आणणे, त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीत खोडा घालणे हे काहींचे उद्योग यशस्वी झाले असले तरी यामुळे धोत्रे यांच्यासाठी ही निवडणूक सध्यातरी सोपी झाल्याचे बोलले जात आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola