अकोला (प्रतिनिधी) : अकोला लोकसभा मतदार संघ गेल्या १५ वर्षापासून भाजपने काबीज केला आहे.गेल्या काही वर्षात बाकी पक्षांना दमदार असा चेहरा न गवसल्याने यावेळेस काँग्रेस कडून डॉ अभय पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉक्टरी पेशा असलेले तसेच सामान्य जनतेशी नाळ जुळलेले असे डॉ अभय पाटील यांनी काही महिन्यांपूर्वी काँग्रेस मध्ये प्रवेश घेऊन संपूर्ण मतदार संघ पिंजून काढून पक्षा मध्ये आपली जागा निर्माण केली होती.गेल्या काही महिन्यांपासून पाटील यांच नाव चर्चेत असतांना आज काँग्रेस पक्षाच्या हायकमांड ने त्याची कारकीर्द व मतदार संघातील परिस्थिती बघता त्यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब करून काँग्रेस पक्षाला अकोला जिल्ह्यात नवचैतन्य दिले आहे असे बोलल्या जात आहे.काँग्रेस पक्षाचे तिकीट कोणाला मिळणार या चर्चेला मात्र पाटील यांचे नाव फायनल झाल्याने पूर्णविराम मिळाला आहे.
अधिक वाचा : तेल्हारा श्रीराम नवमी शोभा यात्रा उत्सव समितीची कार्यकरणी गठीत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola