सातारा (प्रतिनिधी)- पादचाऱ्याला उडवून जाणाऱ्या विशेष पोलीस महानिरिक्षकाचा दर्जा असलेल्या अधिकाऱ्याच्या गाडीला ग्रामस्थांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. परंतु गाडीत पोलीस अधिकारी असल्याचे समजल्यावर त्याला गाडीसहीत सोडून देण्यात आल्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे. संबधित जखमी पादचाऱ्याचा मात्र या आपघातात मृत्यू झाला आहे.
पुणे-बंगळुरु महामार्गावरील साताऱ्याच्या हद्दीत डीमार्टसमोर काळ्या रंगाच्या इनोव्हा कारने (MH 09 EE 0108) एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकेने पादचारी खूप दूरपर्यंत उडाला आणि या अपघातात गंभीर जखमी झाला. अपघातानंतर ही कार तिथे न थांबता निघून गेली. स्थानिकांनी हा अपघात पाहिल्यानंतर गाडीचा पाठलाग केला. स्थानिकांनी ही कार आनेवाडी टोल नाक्याजवळ अडवली.
टोलनाक्याजवळ पकडलेली कार आणि चालकाला स्थानिकांनी भुईंज पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. गाडीत विशेष पोलीस महानिरिक्षक असल्याचे लक्षात आल्यावर पोलीस हतबल झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात कोणत्याही नोंदी न करताच ही इनोव्हा गाडी सोडून दिली.
अधिक वाचा : प्रत्येक पोलीस स्टेशन गाजवणारे बाळापूरचे ठाणेदार गजानन शेळके यांनी एका तासात लावला सोन्याच्या चोरीचा तपास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola