• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

अमरावती येथे ९ व १० मार्च रोजी कॉमेड गोविंद पानसरे प्ररित ९ वे कॉमेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन

Pragati B by Pragati B
March 6, 2019
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
ण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन
11
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी)– कॉमेड गोविंद पानसरे प्ररित नववे कॉमेड अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन ९ व १० मार्च रोजी मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह, अमरावती येथे आयोजन केले. या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष प्रसिध्द विचारवंत व साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर राहणार असून या संमेलनाचे उद्घाटन ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत यांच्या हस्ते होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे असून प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कॉ. भालचंद्र कानगो, आमदार तथा माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड, प्रसिध्द साहित्यिक उत्तम कांबळे आदी मान्यवर उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणार आहे. दुपारी २.३० वाजता ‘आंबेडकर व माक्रस नवे आकलन नव्या दिशा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा.बी.टी.देशमुख व प्रमुख वक्ते म्हणून उध्दव कांबळे उपस्थित राहणार आहेत.

सायंकाळी ४ वाजता ‘अण्णाभाऊंच्या साहित्यातील श्रमिकांचा संघर्ष’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. या कार्यक्रम अध्यक्षस्थानी डॉ.महेबुब सय्यद राहणार असून डॉ. अशोक पळवेकर, डॉ.प्रा.राकेश वानखेडे, डॉ.समाधान इंगळे यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे. सायंकाळी ६ वाजता ‘राष्ट्रवादाचे वर्तमान’ या विषयावर परिसंवाद कॉ.डॉ.भालचंद्र कानगो यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून चंद्रकांत वानखडे, भारत पाटणकर यांचा सहभाग राहणार आहे. रात्री ८ वाजता ‘शाहिरी जलसा’चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १० मार्च रोजी सकाळी १० वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन होणार आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सुखदेव ढाणके राहणार असून सुत्र संचालन प्रा.संजय घरडे करणार आहेत. यामध्ये सुनिता झाडे, विरा राठोड, सुदाम सोनुले, सुनिल यावलीकर, प्रसेनजित गायकवाड, डॉ.गणेश टाले, प्रमोद अहिरे, प्रफुल्ल भुजाडे, मारोती मानेमोड, विलास थोरात, माया वासनिक गेडाम आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

सकाळी ११.३० वाजता ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे भारतातील भवितव्य’ या विषयावर व्याख्यान आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केले असून प्रा.जयदेव डोळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे. दुपारी १ वाजता ‘अण्णाभाऊंच्या लढाऊ नायिका आणि त्यांचा संघर्ष या विषयावर पारसवाद आयोजित केला असून कॉ. प्रा.तानाजी ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रा.डॉ.बी.टी.अौरे, डॉ.नंदा तायवाडे, कॉ.स्मिता पानसरे यांचा प्रमुख सहभाग राहणार आहे. दुपारी ३ वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष डॉ. यशवंत मनोहर असून कॉ.डॉ.भालचंद्र कानगो, कॉ.तुकारात भस्मे, उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थितीत होणार आहे या संमेलनात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध कार्यकर्माचा आस्वाद घ्यावा असे संयोजक प्रा.प्रसेनजित तेलंग, कोषाध्यक्ष प्रा.विजय राग व समन्वयक सागर दुर्योधन अकोल्याचे कॉ. रमेश गायकवाड़, कॉ. एस. एन. सोनोने, कॉ. सुनीता पाटिल, समन्वयक कॉ. नयन गायकवाड यांच्यासह संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे.

अधिक वाचा : पातूर येथे पहिले बाल साहित्य संमेलन थाटात विद्यार्थ्यांनि साकारली विविध दालने

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इमारतीचे भूमिपूजन थाटात संपन्न

Next Post

विना खत, विना फवारणी, एकरी दहा क्विंटल कापूस!

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
विना खत, विना फवारणी, एकरी दहा क्विंटल कापूस!

विना खत, विना फवारणी, एकरी दहा क्विंटल कापूस!

Google Doodle

Olga Ladyzhenskaya यांच्या 97 व्या जन्मदिनी Google Doodle कडून आदरांजली

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.