अकोला (प्रतिनिधी) : राज्यातील कोतवालांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधनात वाढ करण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या महसूल खात्यामार्फत १ मार्च रोजी काढण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील कोतवालांना मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.
कोतवालांच्या कामाचे स्वरूप, त्यांची पूर्णवेळ शासकीय कामाशी बांधीलकी विचारात घेता, कोतवालांना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव ८ जानेवारी २०१९ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आला होता. यासंदर्भात मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कोतवालांना देण्यात येत असलेल्या मानधनात सेवाज्येष्ठतेनुसार वाढ करण्याचा आदेश शासनाच्या महसूल खात्यामार्फत १ मार्च रोजी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यात कार्यरत कोतवालांना त्यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.
अधिक वाचा : जिल्ह्यातील आचारसंहिता च्या पर्वावर पन्नासच्या वर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola