• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 19, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउदयोजक घडतील

Pragati B by Pragati B
May 15, 2020
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला स्टार्टअप फेस्टच्या माध्यमातून भविष्यात अनेक नवउदयोजक घडतील
11
SHARES
563
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) :  समाजाच्या हितासाठी तरुणांच्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याबरोबरच त्यांच्या प्रयोगांना चालना व प्रोत्साहन मिळण्याकरीता अकोला स्टार्टअप फेस्ट तरुणांसाठी एक मोठी संधी ठरली आहे. या माध्यमातून भविष्यात अनेक चांगले नवउदयोजक निश्चितपणे घडतील, असा विश्वास कौशल्य विकास व उदयोजकता विभागाचे राज्यमंत्री तथा अकोला जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य नाविन्यपुर्ण स्टार्टअप धोरणाच्या अनुषंगाने अकोला स्टार्टअप फेस्ट अंतर्गत एक नामवंत व्यवसाय निर्मितीची स्पर्धा अर्थात बिझनेस प्लॅन स्पर्धेचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाव्दारे आज डॉ. पंजाबराव देशमुख कृषि महाविदयालयातील के. आर. ठाकरे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

व्यासपीठावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विदयापीठाचे कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक द.ल. ठाकरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

विविध समस्यांचे निराकरण करण्याकरीता उपयुक्त असलेल्या त्याचप्रमाणे प्रत्यक्ष उद्योगात रुपांतर होऊ शकणा-या नाविन्यपुर्ण संकल्पना असलेल्या कोणत्याही व्यक्ती/गट/ आस्थापना /संस्था यांना सदर स्पर्धेसाठी आंमत्रित करण्यात आले होते. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला सुमारे 60 स्टार्टअपची नोंदणी यावेळी झाली. अनेकांनी कार्यक्रमस्थळाच्या परिसरात आपल्या नाविण्यपूर्ण प्रयोगाचे स्टॉल लावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. स्वत: पालकमंत्री यांनी सर्व स्टॉलला भेट देऊन नाविण्यपूर्ण उपक्रम सादर केल्याबददल त्यांचे कौतुक केले.

पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरीता बनविलेले यंत्र, कचऱ्यावर विविध प्रक्रीया करणारे यंत्र, चोरांपासून आपली दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईलवरुन नियंत्रण करणारी यंत्रणा, हळदीवर प्रक्रीया करणारे यंत्र, पायऱ्यांवर सहजपणे कॅरेटची वाहतूक करणारे उपकरण, नाविण्यपूर्ण डवरणी यंत्र अंधांसाठी समोर येणाऱ्या अडथळयाची सूचना देणारी यंत्र बसविलेली काठी यासारख्या नाविण्यपूर्ण संकल्पना सर्वांचे आकर्षण ठरले.

अनेकांच्या मनात नानाविध चांगल्या कल्पना येतात, या कल्पना प्रत्यक्ष साकार होण्यासाठी आणि त्याचा उपयोग समाजातील नागरिकांना होण्याकरीता शासनाने डिस्ट्रीक बिझनेस प्लॅन स्पर्धा राबविण्याचे ठरविले, असे सांगून पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले की, ही स्पर्धा जिल्हयाबरोबरच विभाग तसेच राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना उदयोग उभारण्यासाठी आर्थिक सहाय केले जाणार आहे. आपल्या जिल्हयातूनही या स्पर्धेच्या माध्यमातून नवउदयोजक घडावेत. स्वयंरोजगाराकरीता कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात, त्याचा लाभही तरुणांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, अकोला स्टार्टअप फेस्ट तरुणांसाठी एक चांगला कार्यक्रम आहे. आपल्या कल्पनांना प्रत्यक्ष साकार करुन त्याचा समाजासाठी फायदा करुन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यापुढेही नाविण्यपूर्ण संकल्पना मांडणाऱ्या तरुणांना प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहिल.

मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, आजच्या युगात नाविण्यपूर्ण संकल्पना मांडणाऱ्यांना प्रचंड संधी आहे. अकोला स्टार्टअप फेस्टसारख्या उपक्रमातून नवीन कल्पना पुढे येण्याबरोबरच त्याचे उदयोगात रुपांतर होण्यास मदत होणार आहे. यातून रोजगाराच्या उपलब्धतेबरोबरच देशाची प्रगतीही होणार आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनीही अकोला स्टार्टअप फेस्टचे कौतुक करुन तरुणांनी आपल्या कल्पनांना मूर्त स्वरुप देण्याचे आवाहन केले.

यावेळी सुशिक्षित बरोजगार उमेदवारांकरीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले होते. विविध सात कंपनीच्या प्रतिनिधीव्दारे सुमारे 350 च्या वर पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या उपक्रमासही चांगला प्रतिसाद लाभला. कार्यक्रमात घरांचे अतिक्रमण नियामानुकूल करण्यात आलेल्या बेघर कुटुंब प्रमुखांना प्रातिनिधीक स्वरुपात नमुना-8 प्रमाणपत्राचे वाटप यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अधिक वाचा : ई.पी.एस. ९५ पेंशनर विषयी केंद्र सरकारचे नकारात्मक धोरणाचा भाजपाच्या मतावर होणार परीनाम- कॉ. देवराव पाटील.

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर सजले अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर

Next Post

बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे  न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

बार्शिटाकळी येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

अकोला जिल्ह्यातील शहापूर परिसरात आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह

अकोला जिल्ह्यातील शहापूर परिसरात आढळला पट्टेदार वाघाचा मृतदेह

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.