तेल्हारा (योगेश नायकवाडे)- एम. एस. इ. वर्कर्स फेडरेशन तेल्हारा शाखा ची आढावा बैठक स्थानिक विश्राम गृह येथे सायंकाळी संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानी कॉ गाडे, प्रामुख्याने अकोट विभागीय सचिव कॉ योगेश राऊत, कॉ नरेंद्र वानखेडे, कॉ तायडे, कॉ अमित सातलेकर उपस्तीत होते. यावेळी कामगार, आउट सोर्स, सुरक्षा रक्षक यांच्या समस्या दूर करण्यासाठी फेडरेशन च्या वतीने प्रामाणिकपने कार्य होत असून पुढे देखील संघर्ष सुरू राहील आणि फेडरेशन कामगारा च्या पाठीशी असल्याचे विभागाचे सचिव कॉ योगेश राऊत यांनी सांगितले, त्याच प्रमाणे कॉ गाडे, कॉ सातलेकर यांनी सुध्दा बैठक मध्ये मार्गदर्शन केले, अकोला परिमंडळ उपाध्यक्ष कॉ प्रमोद ढोले, मंडळ सचिव कॉ सतीश नवले, कॉ निलेश मगर यांच्याशी विचार विनिमय करून आउट सोर्सिंग कामगार सेल तेल्हारा उपविभाग अध्यक्ष पदी कॉ सोपान कसुरकर यांची नियुक्ती करण्यात आली. उपस्थित कॉ गाडे यांच्या हस्ते कॉ सोपान कसुरकर यांचं सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बैठक ला कॉ मोरोकर, कॉ चोपडे, कॉ शरद वानखडे, कॉ उज्जैनकार, कॉ माकोडे, कॉ मालगणे,कॉ शेकोकार, कॉ आमझरे, कॉ योगेश खोंडील, कॉ चंदन, सहित सर्व सदस्य उपस्थित होते, कार्यक्रम संचालन कॉ अफसर शाह, शाखा सचिव, तर आभार प्रदर्शन कॉ सतलेकर यांनी केले.
टीप-कॉ सोपान कसुरकर यांना नियुक्ती पत्र देताना कॉ गाडे, शाखा सचिव कॉ अफसर शाह, कॉ योगेश राऊत व इतर उपस्थित होते.
अधिक वाचा : संत तुकाराम महाराज जयंती सोहळा निमित्य व्याळा येथे नियोजन बैठक संपन्न
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola