चार लोकांच्या भल्याचे काहीही कानावर पडले की तो सढळ हाताने मदत करतो,स्वतः त्या कामाचा पाठपुरावा करतो एवढेच नव्हे तर त्या कामांचे सातत्य कसे टिकेल याची व्यवस्था लावून देतो …तो झपाटलेला तरुण म्हणजे सातपुड्याच्या कुशीतील हिवरखेडचा सुपुत्र अनिल गावंडे. कवी बनारसी सांगतात ‘जिंदगी वह हे जो काम आये किसीके वारणा इसको तो हर कोई गूजार सकता है…!
अनंत विषयांना भिडण्याचे कठीण काम सध्या हा तरुण करीत आहे,तेल्हारा आणि अकोट तालुके तसे मुबलक पाण्याचे तालुके म्हणून ओळखले जातात,निसर्गाने पाण्याने भरलेल्या विहिरी आम्हाला प्रदान केल्या पण आम्ही गेली 50 वर्ष पाणी उपसण्याचे अधिकार गाजवत बसलो,त्यात काहीतरी टाकावे लागते,पाणी जिरवावे लागते हे कर्तव्य विसरलो त्यामुळे दोन्ही तालुके पाण्याच्या दुष्काळाने पीडित बनले, पाणी फाउंडेशनने त्यासाठी काही करायचे ठरवले तेव्हा कोणताही गाजवाजा न करता कर्तव्य म्हणून काम करीत राहिला तो तरुण होता अनिल गावंडे,मागच्या वर्षी लोकजागर मंच च्या माध्यमातून अनिल गावंडे यांनी तेल्हारा व अकोट तालुक्यातील 22 गावे दत्तक घेऊन 9 लक्ष रु.डिझेल ची मदत केली.त्या गावांमध्ये शोष खड्ड्यांसाठी लागणारे साहित्य, पोकलँड व जेसीबी मशीनीकरिता डिझेल, दगड, टोळ, श्रमदानाकरिता घेमेले-फावडे, श्रमदात्यांकरीता गुलकोज डी एनर्जी ड्रिंकची पाकिटे,शुद्ध पाण्याची व्यवस्था, स्पर्धेदरम्यान विविध ठिकाणी आयोजित महाश्रमदानात अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली.
यावर्षी सुद्धा लोकजागर मंच घमेले, फावडे, डिझेल, श्रमदात्यांची आरोग्य तपासणी व औषधौपचार, शुद्ध पाणी व एनर्जी ड्रिंक सह जिथे कमी तिथं आम्ही यावर्षी अकोट व तेल्हारा या दोन्ही तालुक्यातील 40 गावाना मदत करण्याचे नियोजन आहेअसे अनिल भाऊनी प्रामुख्याने सांगितले. वॉटर कप स्पर्धेत जास्तीत जास्त गावांनी भाग घ्यावा व ट्रेनिंग मध्ये सहभागी व्हावे या करीता लोकजागर मंचचे पदाधिकारी,सदस्य गावो-गावी जाऊन युवकांना प्रेरीत करीत आहेत.
अधिक वाचा : राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी अनिल गावंडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola