• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 14, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

तत्कालीन आयुक्तांच्या चुकीमुळे मनपाला तीन कोटी रुपयांचा फटका

Pragati B by Pragati B
May 16, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
तत्कालीन आयुक्तांच्या चुकीमुळे मनपाला तीन कोटी रुपयांचा फटका
11
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला (प्रतिनिधी) – रिलायन्सचे भूमिगत केबल टाकताना निश्चित केलेला दंड न स्वीकारता दंडाची रक्कम कमी केल्याने मनपाचे तीन कोटीचे आर्थिक नुकसान झाले आहे. स्थायी, महासभेची परवानगी न घेता, हा निर्णय घेणारे तत्कालीन आयुक्त तसेच बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम कपात करावी, अशी मागणी सभागृह नेत्या यांनी महापौरांकडे केली आहे.

शहरात २०१३-२०१४ रोजी रिलायन्स कंपनीचे भूमिगत केबल टाकण्याच्या कामाची परवानगी मागितली. प्रथम ही परवानगी नाकारली. त्यानंतर २०१४ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी ८८ किलोमीटर लांबीची केबल टाकण्यासाठी १२ कोटीचे शुल्क आकारल्या नंतर कामाला मंजुर दिली. यापैकी ५८ कि.मी.ची केबल टाकल्या नंतर अनेक नगरसेवकांनी या कामाबाबत तक्रारी केल्या. त्यामुळे ३० कि.मी. केबल टाकण्याचे काम थांबवले. दरम्यान कल्याणकर यांची बदली झाली. त्या नंतर सोमनाथ शेटे आले. त्यांच्या कार्यकाळात हे प्रकरण पेंडिग होते. त्यांच्या बदलीनंतर २०१५ ला अजय लहाने आयुक्त म्हणून रुजु झाले. त्यांच्या कार्यकाळात रिलायन्सने ३० किलोमीटर केबल टाकण्याची परवानगी मागतील. प्रशासनाने रस्ता क्रॉसींगचा खर्च, दंड असे ७ कोटी ६९ लाख भरण्याचे आदेश दिले. परंतु रिलायन्स कंपनीने ३० पैकी १७, त्यानंतर १५ कि.मी.ची केबल टाकण्याची परवानगी मागीतली. दरम्यान लांबी कमी झाल्यानंतर दंड रस्ता क्रॉसींगचे शुल्क भरावेच लागणार होते. तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांंनी रिलायन्स दंड भरण्यास तयार नसल्याची नोटशिट चालवली. त्यानंतर रिलायन्स कडून ३ कोटी, विलंब शुल्क १३ लाख माफ केले. यावर कार्यकारी अभियंता, शहर अभियंता, आयुक्तांनी स्वाक्षऱ्या केल्या. हा निर्णय घेताना स्थायी अथवा महासभेची मंजुरी घेणे गरजेचे होते. परंतु तशी परवानगी न घेता, सुट दिली. यामुळे मनपाला ३ कोटीचे नुकसान सहन करावे लागले. ही बाब मनपाला परवडणारी नसल्याने शुल्क परस्पर माफ करणारे तत्कालीन आयुक्त, कार्यकारी अभियंता, शहर अभियंत्यांच्या वेतनातून ही रक्कम कपात करावी, अशी मागणी गिताजंली शेगोकार यांनी केली आहे.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

लेखा परीक्षणामध्येही ओढण्यात आले ताशेरे
महालेखाकार नागपूर यांच्या चमूने २०१७-२०१८ च्या केलेल्या लेखा परीक्षणात रिलायन्सच्या केबल टाकण्याच्या कामात दंड माफ केल्या बाबत ताशेरे ओढले आहेत. ही बाबही महत्त्वाची.

विहीर गाळ घोटाळाप्रकरणी अखेर कनिष्ठ अभियंत्यावर केली कारवाई
विहिरीतील गाळ घोटाळा प्रकरणी अखेर कनिष्ठ अभियंत्यावर कारवाई करण्यात आली. कनिष्ठ अभियंता हा मानसेवी कर्मचारी असल्याने मानसेवी कर्मचाऱ्यांच्या मुदत वाढीच्या यादीतून त्याचे नाव वगळण्यात आले. परंतु या फाइलवर स्वाक्षऱ्या करणारे सर्व वरिष्ठ अधिकारी मात्र वाचले. तसेच अद्याप या प्रकरणात एफआयआरही दाखल झाला नाही.

या संदर्भात सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाणी टंचाईच्या काळात विहिरीतील गाळ काढून त्या पुनर्जीवित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. हे काम कंत्राटदारांकडून करुन घेण्यात आले. याच अनुषंगाने देवराव बाबा चाळीतील विहिरीचा गाळ काढण्याचे काम एका कंत्राटदाराला देण्यात आले. कंत्राटदाराने गाळ काढला, त्यानंतर आता देयकाची फाइल चालवण्यात आली. देयकाच्या फाइलवर सर्व अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्या नंतर आयुक्तांच्या अंतिम स्वाक्षरीसाठी ही फाइल त्यांच्याकडे गेली. फाइलचा अभ्यास केल्या नंतर पाच ते सात मीटरचा गाळ काढलेलाच नसताना गाळ काढल्याचे दर्शवून देयक सादर करण्यात आल्याची बाब आयुक्तांच्या लक्षात आली. विशेष म्हणजे या फाइलवर कनिष्ठ अभियंत्यापासून ते कार्यकारी अभियंत्या पर्यंत सर्वांच्या स्वाक्षऱ्या होत्या. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र एफआयआर दाखल न करता मानसेवी असलेल्या कनिष्ठ अभियंत्याला मुदतवाढ न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

कनिष्ठ अडकला, वरिष्ठ सुटले
विहिरीतील गाळ काढण्याच्या फाइलवर कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता, लेखा विभाग, उपायुक्त आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र या फाइल मधील विहिरीतील गाळ घोटाळा कोणाच्याही लक्षात आला नाही. त्यांनी चुकीच्या फाइलवर स्वाक्षऱ्या केल्या. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांसोबत ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देयक मंजुरीवर स्वाक्षऱ्या केल्या, ते अधिकारीही जबाबदार आहेत. मात्र या प्रकरणात केवळ कनिष्ठ अभियंत्यावरच कारवाई झाली.

पदवी कोणती, काम करतात कोणते ?
महापालिकेत मानसेवी तसेच कायमस्वरुपी कर्मचारी यांच्याकडे पदवी कोणत्या विषयाची असते अथवा त्यांची मुळ आस्थापना वेगळ्याच विभागात असते त्यांना वेगळ्याच विभागात काम करावे लागते. पाणी पुरवठा विभागात कार्यरत कनिष्ठ अभियंता हा सिव्हिल इंजिनिअर नव्हता तर मेकॅनिकल इंजिनिअर आहे, अशी माहिती मिळाली आहे. मॅकेनिकल इंजिनिअरकडे पाणी पुरवठा विभागाचे काम सोपवले होते.

अधिक वाचा : मनपाच्या तत्कालीन आयुक्तांसह शहर अभियंत्यावर कारवाई होण्याची शक्यता

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

लूडो डिजिटल जुगार खेळणाऱ्या वर पातुर पोलिसांची कारवाई

Next Post

वंदनीय हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भगवा झंझावत

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
वंदनीय हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भगवा झंझावत

वंदनीय हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त भगवा झंझावत

तेल्हारा तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कारवाया

तेल्हारा तालुक्यात गुड मॉर्निंग पथकाच्या धडक कारवाया

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.