अकोला(प्रतिनिधी) : भारिप बहुजन महासंघाचे नेते एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात फुले आंबेडकर विद्वत सभा कार्य करीत आहे . शेतकरी, शेतमजूर, कामगार ,आदिवासी ,मुस्लिम, ओबीसी या वंचित समूहाच्या विकासासाठी तसेच संविधानाची मूलभूत तत्वांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी खालील मागण्या करीत आहे.
१) आर्थिक आधारावर आरक्षण ही संकल्पना असंविधानिक आहे. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही तर हजारो वर्षे वंचित राहिलेल्या मागासलेल्या समूहांसाठी प्रतिनिधित्वाची केलेली सोय आहे त्यामुळे आरक्षणाचा सामाजिक आधार हाच महत्त्वाचा असून आर्थिक आरक्षण म्हणजे घटनेच्या मूलभूत तत्त्वांवर केलेला हल्ला आहे. घटनात्मक प्रमुख म्हणून संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे ,म्हणून आर्थिक आधार आरक्षणाचा फेरविचार करून तो रद्द करण्यात यावे.
२)सवर्ण समूहातील गोरगरिबांच्या कल्याणासाठी तसेच सर्वच समूहातील गरिबांसाठी घटनेतील तरतुदीनुसार शिक्षण, रोजगार, आरोग्य तसेच सर्वांगीण विकासासाठी विशेष कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात यावी जो गरिबांचा संविधानिक अधिकार आहे.
३)सरकारी सेवेतील जागा कंत्राटी पद्धतीने भरणे म्हणजे घटनाबाह्य आहे .ही सरकारी-निमसरकारी सेवेतील पदे पूर्णवेळ कायमस्वरूपी भरण्यात यावी. कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेली बँक, रेल्वे ,शिक्षण, आरोग्य ,पोलीस, होमगार्ड या पदांवर कार्यरत व्यक्तींना नोकरीत कायम करण्यात यावे. मागासवर्गीयांना नोकरीतील बॅकलोग भरण्यात यावा.
४)समान शिक्षण मोफत शिक्षण ही संकल्पना राबविण्यात यावे.
५)अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली आंबेडकरी कार्यकर्त्यांची सुरू असलेली मुस्कटदाबी थांबवून शासन-प्रशासन पोलिसांच्या दडपशाहीला लगाम घालण्यात यावा.
६)भारतीय संविधान विषयी अपशब्द बोलणाऱ्या व्यक्ती संस्था संघटना राजकीय पक्ष यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी तो अजामीनपात्र गुन्हा ठरवून तात्काळ अटक व्हावी.
वरील सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदनावर प्रा. विजय आठवले ,प्रा. प्रमिला बोरकर, प्रा. सुरेंद्र मोरे, प्रा.डॉ.बाळकृष्ण खंडारे ,आर .आर .भालेराव, अ. नि.गुडदे ,आनंद डोंगरे , के. एम.कोल्हे ,संजय हमराजी वेलकर ,सुनील गवई ,ज्ञा. बा.गवई ,भारत राघोजी दामोदर सर इत्यादी सदस्यांच्या सह्या होत्या. असे फुले आंबेडकर विद्वत सभेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रा.विकास दामोदर यांनी कळविले.
अधिक वाचा : अकोल्यात चालत्या ट्रकने घेतला पेट, चालकाने उडी मारुन वाचविला जीव
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola