अकोला (प्रतिनिधी)– थॅलेसेमिया या आजाराने २३ वर्षापूर्वी मुलाचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच कुणाचेही मूल या आजाराचे बळी ठरू नये, म्हणून ज्येष्ठ व्यावसायिक, भाजपचे नगरसेवक हरीश आलिमचंदानी यांनी खूणगाठ बांधून थॅलेसेमियाग्रस्तांसाठी काम सुरु केले. बसस्थानकाजवळ डे केअर सेंटरची स्थापना केली. या डेकेअर सेंटरमध्ये ५३ रुग्ण उपचार घेताहेत. त्यात पाच वर्षातील २४ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २० रुग्णांवर बोनमेरो करून त्यांना जीवदान दिले . यासाठी हरीश आलिमचंदानी यांनी लाखोंच्या खर्चाचा भार सामाजिक दायित्व म्हणून उचलला आहे.
थॅलेसेमिया हा रक्ताचा आनुवंशिक आजार आहे. थॅलेसेमिया मायनर पती-पत्नीचे अपत्य थॅलेसेमिया मेजर आजार घेऊन जन्मास येण्याची शक्यता असते. थॅलेसेमिया मेजर रुग्णाला जगण्यासाठी आयुष्यभर दुसऱ्याच्या रक्तावर अवलंबून राहावे लागते. अशा रुग्णांना हरीश आलिमचंदानी हे स्नेहाचा आधार देत त्यांच्या जीवनात आनंद व प्रेमाची रुजवात करतात. जिल्ह्यात २२५ थॅलेसेमियाचे रुग्ण आहेत. त्यांंची परवड पाहून आलिमचंदानींना मुलाची आठवण स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातून त्यांनी थॅलेसेमिया सोसायटीची स्थापना केली. या आजाराची झळ पोहोचलेल्यांसाठी ते जीवनाचा किरण ठरले. बसस्थानकाजवळ डे केअर उभारले या डे केअरमध्ये दररोज पाच ते सात थॅलेसेमियाबाधीत उपचार घेतात. ज्या रुग्णांचा बोनमेरो जुळून येत असेल, अशासाठी शासकीय, स्वयंसेवी संस्था, देवस्थानांकडून काही व काही स्वत:ची मदत हरीश आलिमचंदानी करताहेत. डे केअर सेंटरमध्ये डॉ. विनीत वरठे,डॉ. सचिन सदाफळे हे निःशुल्क सेवा देतात. ही सोसायटी थॅलेसेमिया बाधितांकडून शुल्क घेत नाही. या रुग्णांसाठी लागणाऱ्या रक्ताचा पुरवठा हेडगेवार रक्तपेढी निःशुल्क करीत आहे.
थॅलेसेमियापासून मुक्ती; तर हे करा
अविवाहित युवक व युवतींनी रक्ताची चाचणी करावी, अपत्यप्राप्तीचे नियोजन करणाऱ्या दाम्पत्यांनी आठ आठवड्याची गर्भधारणा झालेल्या अवस्थेमध्ये थॅलेसेमिया मायनर आजाराच्या रक्ताची चाचणी करावी. प्रत्येक व्यक्तीने थॅलेसेमिया मायनर आजाराच्या रक्ताची चाचणी केल्यास थॅलेसेमियापासून मुक्ती मिळवता येईल.
अधिक वाचा : गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेपासून एकही बालक वंचित ठेवू नये : जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola