तेल्हारा (प्रतिनिधी) : तेल्हारा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेला वाहतूक पोलीस आज दुपारी चार वाजता पाच हजाराची लाच घेतांना अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले.
तेल्हारा पोलीस ठाण्यात गेल्या अडीच तीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या तसेच वसुली मॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाहतूक पोलिस प्रकाश जाधव याला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.शहरातील बस स्थानकच्या बाजूला असलेल्या परिसरात आनंद मेळा तसेच स्वयंरोजगार प्रदशनी चे आयोजन केले होते त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता.सदर मेळावा ६ जानेवारी रोजी संपला होता.
सदर मेळावा वर कारवाई न केल्याच्या मोबदल्यात वाहतूक पोलीस प्रकाश जाधव याने पाच हजाराची मागणी केली होती.अकोट येथील तक्रारदार यांनी लाच मागितल्या प्रकरणी लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून आज दुपारी चार वाजता सापळा रचून लाचेची रक्कम घेत असताना वाहतूक पोलीस याला रंगेहाथ पकडले असून जाधव याला ताब्यात घेण्यात आले आहे.सदर वाहतूक पोलीस हा तेल्हारा वाहतूकदार यांना डोकेदुखी ठरत होता.जबरन वाहतूक दारांकडून वसुली अशा प्रकारचा त्रासाला वाहतूक दार त्रासले होते.आज झालेल्या कारवाईत सदर वाहतूक पोलीस अडकल्याने तेल्हारा पोलीसांचे धाबे दणाणले आहे.सदर कारवाई पोलीस अधीक्षक धिवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक ईश्वर चव्हाण,पोहेकॉ दामोदर,पोलीस नाईक अनवर खान यांनी केली.
अधिक वाचा : सम्यक विद्यार्थी आंदोलनचे उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola