तेल्हारा (प्रतिनिधी) : शहरातील प्रतिनिष्ठ नागरिक तसेच माजी भाजपा तालुकाध्यक्ष तसेच तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाभाऊ राजनकर यांचे आज दुपारी ४ वाजता दुःखत निधन झाले.
तेल्हारा येथील रहिवाशी तसेच भाजपचे जेष्ठ नेते स्वर्गीय पंडितराव राजनकर यांचे लहान भाऊ ,माजी जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई राजनकर यांचे देर तसेच तेल्हारा तालुक्यात भाजप पक्ष वाढीस नेणारे माजी तालुकाध्यक्ष राजाभाऊ राजनकर यांनी पक्ष बांधणी करिता एक चांगली फळी पक्षकरिता निर्माण केली होती.त्यांच्या कारकिर्दीत गाव तिथे शाखा तसेच शेकडो युवक कार्यकर्त्यांची पक्षात प्रवेश यामुळे भाजपा साठी त्यांच्या कारकिर्दीत चांगले दिवस आले होते.
प्रत्येक कार्यकर्त्याला ते आपल्या भावासारखे तसेच मुलासारखे समजत असत त्यामुळे त्यांच्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करीत असत.राजाभाऊ राजनकर यांच्या मृत्यूने भाजप पक्षात एक प्रकारे पोकळी निर्माण झाली असून त्यांची ही कमी भाजप मध्ये न भरून निघणारी आहे.त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे.त्यांच्यावर स्थानिक वैकुंठधाम येथे आज सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
अधिक वाचा : अकोट ते खंडवा ब्रॉडगेज रेल्वेमार्ग सातपुड्याच्या जंगलातुन न जाणार पर्यायी मार्गाने !
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola
Comments 1