अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची प्रमुख भूमिका आणि वादग्रस्त संवादांमुळं चर्चेत असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील ‘ठाकरे’ चित्रपटाच्या म्युझिक लाँचचा सोहळा आज मोठ्या दिमाखात पार पडला. ‘ठाकरे’ चित्रपटातील पहिलं गाणं आज प्रदर्शित करण्यात आलं. ‘आया रे आया सबका बापरे… कहते उसको ठाकरे‘ असे या गाण्याचे बोल असून काही मिनिटांतच यूट्यूबवर या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत.
वांद्रे येथील ताज लँड्स हॉटेलात हा सोहळा पार पडला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, चित्रपटाचे निर्माते खासदार संजय राऊत, चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, अभिनेत्री अमृता राव हे यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वावर भाष्य करणारं हे गाणं असून ते नकाश अजीज यांनी गायलं आहे. संगीत रोहन रोहन यांनी दिलं आहे.

अधिक वाचा : ‘मणिकर्णिका’चं पहिलं गाणं प्रदर्शित
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola