अकोला (प्रतिनिधी) : निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. आज शहरातील मध्यवर्ती कारागृह येथे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सर्व कैद्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत सविस्तर मार्गदर्शन करून त्यांच्याकडून प्रात्यक्षिक करून घेतले.
यावेळी उपविभागीय अधिकारी निलेश अपार, कारागृह अधीक्षक दयानंद सोरटे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सुभाष निर्मळ, मंडळ तुरुंग अधिकारी राजेंद्र राठोड, मिलिंद बनसोडे यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत माहिती देऊन या यंत्राबाबत कैदयांच्या अडचणी जाणून घेतल्या. निवडणुक प्रक्रीया अत्यंत पारदर्शक पध्दतीने पार पाडण्यासाठी आता मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्रही वापरले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर आपण केलेले प्रत्यक्ष मतदान आपल्याला व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून दिसणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर या संपूर्ण प्रक्रीयेचे प्रात्यशिकही दाखविण्यात आले. यावेळी त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत सविस्तर माहिती दिली. काही कैदयांना समोर बोलावून त्यांनी मतदान कसे करायचे आणि व्हीव्हीपॅट यंत्रावर आपण केलेले मतदान कसे बघायचे याचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. पूर्वी मतदानासाठी बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट हे दोन यंत्र होते, आता आगामी निवडणुकीत या यंत्रासोबतच व्हीव्हीपॅट यंत्रही राहणार आहे. या यंत्रामुळे मतदान कुणाला केले हे दिसणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
साधारणतः 350 पैकी 70 टक्के कैदी शिक्षा संपवून फेब्रुवारी /मार्च पर्यन्त बाहेर पडणार आहेत,असे कारागृह प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola