अकोला (प्रतिनिधी): स्वच्छ सर्वेक्षण २०१९ च्या अनुषंगाने स्वच्छता अॅपवर आधारित डायनॅमिक रॅकिंगमध्ये अकोला शहराची घसरण झाली आहे. पाच हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणात स्वच्छता अॅपच्या वापरावर एकूण ४०० गुण आहेत.
४ जानेवारीपासून केंद्राच्या क्यूसीआय (क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया)ने स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला प्रारंभ केला असता विदर्भातील जिल्ह्यांमधील ११ शहरांना पहिल्या शंभर क्रमांकात स्थान नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अकोला महापालिका २५९ व्या स्थानावर असून, अमरावती महापालिका १३० व्या स्थानावर आहे.
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देशभरातील स्वच्छ शहरांचे गुणांकन करण्यासाठी यंदा केंद्राच्या चमूने सलग चौथ्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणाला सुरुवात केली आहे. ५ हजार गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या तपासणीला ४ जानेवारीपासून सुरुवात झाली असून, स्वच्छता अॅपच्या वापरासाठी ४०० गुण आहेत. स्वच्छता अॅप किती नागरिकांनी डाउनलोड केले, त्याचा किती जणांना वापर केला, अभिप्राय काय दिला, आदी घटकांवर स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान ४ हजार शहरांचे ‘डायनॅमिक रॅकिंग’ ठरविण्यात येते.
११ आॅगस्ट २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ या कालावधीत संबंधित शहरांनी स्वच्छता अॅपचा किती प्रमाणात वापर केला, नागरिकांच्या समस्यांचे प्रशासनाने निराकरण केले का व त्यानंतर तक्रारकर्त्याने काय अभिप्राय दिला, आदी घटकांसाठी ४०० गुण प्राप्त होतील. केंद्राच्या क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाच्या चमूने ४ जानेवारीपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात विदर्भातील ११ जिल्ह्यामधील अमरावती महापालिका १३० व्या क्रमांकावर असून, अकोला महापालिका २५९ क्रमांकावर असल्याची माहिती आहे.
अधिक वाचा : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola