अकोला :- जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसिलदार दीपक पुंडे, पोलीस पाटील सुजय देशमुख, तलाठी प्रशांत बुले आदींसह मोठया संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी यांनी गावात फेरफटका मारुन रस्ते, पथदिवे यासह प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी करुन लाभार्थ्यांशी चर्चा केली.
रमाई घरकुलचे लाभार्थी संजय दंदी यांच्या घराच्या कामाची त्यांनी पाहणी करुन विचारणा केली. गावाला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भारतीय जैन संघटनेमार्फत जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात करण्यात येतील. तसेच विहीर व बोअरचे अधिग्रहण करुन पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच मुख्यमंत्री पेयजल योजनेत दीड कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगून त्यांनी ग्रामस्थांना दिलासा दिला.
अधिक वाचा : मानवी जीवनात देवालयाइतकेच वाचनालयाचे महत्व असावे -पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola