मुंबई : मुंबई-दिल्ली-लखनौ या विमानात बॉम्ब आहे, अशी माहिती एका महिलेकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मुंबई विमानतळावर इंडिगोच्या या विमानाची तपासणी केली. पण तपासणीदरम्यान पोलिसांना या विमानात काहीही सापडलं नाही.
मुंबई-दिल्ली-लखनौ या इंडिगोच्या विमानात बॉम्ब आहे, असं एका सिंगापूरच्या महिलेनं पोलिसांना कळवलं. यानंतर पोलिसांनी तातडीने या विमानाची तपासणी केली. पण या विमानात काहीही मिळालं नसल्याने पोलीस आता फोन करून माहिती देणाऱ्या महिलेची चौकशी करत आहेत.
‘मी अशा लोकांना ओळखते ज्यांनी याआधीही विमानात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे,’ असा दावाही संबंधित महिलेनं केला आहे. त्यामुळे सहार पोलिसांनी या महिलेची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, महिलेने विमानात बॉम्ब असल्याची माहिती दिल्यानंतर काही काळ चांगलीच खळबळ उडाली होती. पण या विमानात काहीही सापडलं नसल्याने आता सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
अधिक वाचा : राफेल विमान प्रकरण : मोदी सरकारला सुप्रीम कोर्टाची क्लीन चिट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola