मुंबई : आपल्या ताफ्यामध्ये दोनशे विमाने बाळगणारी इंडिगो ही पहिलीच भारतीय विमान कंपनी ठरली आहे. इंडिगोने नुकतेच विकत घेतलेले ए ३२० नीओ (व्हीटी-आयझेडआय) हे विमान त्यांच्या ताफ्यातील दोनशेवे विमान ठरले. या विमानाने दिल्ली ते टॉलॉस (फ्रान्स) हा प्रवास केला.
Wherever you’re headed, there’s an IndiGo aircraft that’s waiting to take you there. We now have a fleet of 200 aircraft. India’s largest fleet is at your service. #6EMilestone #6EMoment #200AtYourService pic.twitter.com/4ZbuAD2zha
— IndiGo (@IndiGo6E) December 6, 2018
ऑगस्ट २००६मध्ये व्यवसायास सुरुवात केलेल्या इंडिगोने खासगी विमान कंपन्यांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवले आहे. डीजीसीएच्या (नागरी हवाई वाहतूक महासंचलनालय) अहवालानुसार ऑक्टोबर २०१८अखेरीस भारतीय विमान व्यवसायात इंडिगोने ४३ टक्के हिस्सा काबिज केला आहे. ऑक्टोबरमध्येच इंडिगोच्या महिनाभरातील प्रवाशांची संख्या ५० लाख नोंदवली गेली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय कंपनी ठरली.
जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत इंडिगोला ६५२ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. या कंपनीला तोटा होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. मात्र १३,१६३ कोटी रुपयांची रोकड असल्याने कंपनीची स्थिती मजबूत असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola