अकोला (शब्बीर खान) : जुन्या वादातून एकाला वाहनाखाली ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांविरुद्ध जुने शहर पोलीस स्टेशनला रविवार, २५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर रोजी अयूब खान, शेख रफिक कापशी येथे गुरांच्या बाजारात खरेदी करण्यासाठी गेले होते. ते आपल्या मोटारसायकलने परत येत असताना एका मोटर वाहनाने त्यांना उडविले. यात शेख रफिक हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी शेख रफिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुने शहर पोलीस स्टेशनला भादंविच्या कलम २७९, ३३७, ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासादरम्यान हा अपघात नसून, शेख रफिक यांना ठार मारण्याचा कट जुन्या वादातून रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणात पोलिसांनी रविवार, २५ नोव्हेंबर रोजी भादंविच्या कलम ३०७, १२० ब वाढविण्यात असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या प्रकरणात जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख अन्वर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रामराव राठोड अधिक तपास करीत आहेत.
अधिक वाचा : अकोल्यात शिक्षणासाठी येत असलेल्या शाळकरी मुलांच्या अॅपेला अपघात; विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola