अकोला(योगेश नायकवाडे): डिजीटल महाराष्ट्र साकारण्यात महत्वाचे योगदान असलेल्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी परिचालकांनी 21 नोव्हेंबरला पुकारलेल्या ट्विट मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल 1 लाख 10 हजार जणांनी या मोर्चाला ट्विट केले. आता यानंतर 27 नोव्हेंबरला हिवाळी अधिवेशनात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये गेली 7 वर्षे संगणकीय सेवा देणारे ग्रामपंचायत संगणक परिचालक ग्रामपंचायतीमधील सर्व अत्यावश्यक सेवांसोबतच छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी, प्रधानमंत्री पीक-विमा योजना, अस्मिता योजना, राज्यातील घरकुल योजना सर्व्हे यांसारखी इतर अनेक कामे करीत असतात तरीही त्यांना हक्काचं मानधन वर्ष-सहा महिने मिळत नाही.
तसेच 14 व्या वित्तअयोगाचा ग्रामविकासाचा निधीचा CSC-SPV सारखी त्रयस्थ कंपनी मधल्या-मध्ये भ्रष्टाचार करीत आहे. यामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या डिजिटल विकासाला खीळ बसली आहे. या भ्रष्टाचाराच्या विरोधातील आवाज उठवण्यासाठी आणि न्याय मागण्यासाठी ट्विट माध्यमातून 21 नोव्हेंबर ट्विटरवर मोर्चा काढण्यात आला. याला 1 लाख 10 हजार ट्विट झाले तर ट्रेंडिंगमध्ये भारतात पहिल्या क्रमांकांची नोंद झाली. या ट्विट हल्ल्यांतर प्रत्यक्ष मुंबई हिवाळी अधिवेशनावर 27 नोव्हेंबर रोजी संगणक परिचालक धडकणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश मातळे यांनी सींगितले. संगणक परिचालक हे पद निश्चित करुन आयटी महामंडळाकडून नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतरच मुंबईतील आंदोलन स्थगित केले जाणार आहे.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola