मुंबई : जर तुम्ही बँकेतून रोख काढण्यासाठी एटीएमचा वापर करत असाल, तर लवकरच तुम्हाला एटीएम साठी भरपूर पायपीट करावी लागू शकते. कारण देशातले ५० टक्के एटीएम मार्च २०१९ पर्यंत बंद पडू शकतात. एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर अपग्रेड आणि रोख व्यवस्थापन योजनांच्या ताज्या मानकांनुसार देशातले अर्धे एटीएम बंद पडू शकतात. एटीएम उद्योगाची संस्था दी कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्री (CATMi)ने हा इशारा दिला आहे.भारतात सद्यस्थितीत सुमारे दोन लाख ३८ हजार एटीएम आहेत. यापैकी एक लाख ऑफ साइट आणि १५ हजारपेक्षा अधिक व्हाइट लेबल एटीएमसह १ लाख १३ हजार एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. एटीएम हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसंबंधीचे निर्देश, रोख रकमेच्या व्यवस्थापनाच्या अद्ययावत अटी आणि कॅश लोडिंग कॅसेट स्वॅप करण्याची पद्धत यामुळे हे एटीएम बाधित होण्यचाी शक्यता आहे. एटीएम बंद झाल्यास या उद्योगात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीदेखील येऊ शकते.CATMiनुसार या एटीएम्सना चालवणे आर्थिक हिताचे नाही. पण एटीएमबंद झाल्यास नोटाबंदीसारखं वातावरण तयार होऊ शकतं. एटीएम कंपन्या ब्राऊन लेबल आणि व्हाइट लेबल यांना नोटाबंदीत झालेलं नुकसान अजून भरून निघालेलं नाही.कॅश लॉजिस्टिक आणि कॅसेट स्वॅप मेथडमध्ये बदल करण्यासाठी सुमारे ३,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संस्थेच्या म्हणण्यानुसार, व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्स आधीत तोट्यात आहे, त्यामुळे ते अतिरिक्त तोटा उचलू शकत नाहीत. त्यामुळे एटीएम इंटरचेंज हेच उत्पन्नाचं साधन आहे. जर बँकेने त्यांना भरपाई दिली नाही तर मोठ्या प्रमाणावर एटीएम कंत्राट सरेंडर होतील. परिणामी एटीएम बंद पडतील.
अधिक वाचा : मारुतीची नवी Ertiga भारतात लाँच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola