तेल्हारा : या पावसामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून या पावसामुळे काही भागातील रब्बीच्या पिकांना जीवदान लाभणार आहे. सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने काही भागात सूर्यदर्शन झाले नाही.
अकोला जिल्ह्यातील तेल्हाराश, बाळापूर तालुक्यात कमी अधिक प्रमाणात सोमवारी पावसाने हजेरी लावली. काही भागात मेघगर्जनेसह दमदार पाऊस झाल्याने शहरी भागात मोठ्या प्रमाणत पावसाचे पाणी साठले होते.रब्बी गहू, हरबरा, तूर, मका, करडी या पिकांसाठी जीवदान देणारा ठरू शकतो असे शेतकरी वर्गात बोलले जात आहे. सोमवारी सकाळपासूनच बदललेले वातावरण आणि वाढत गेलेली उष्णता याचा परिणाम संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात पावसाला सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासूनच तेल्हारा शहरात ढगाळ वातावरण होते. संध्याकाळी 5 वाजता आकाशात काळे ढग दाटून आले. त्यानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांना पावसात भिजावे लागले. या पावसामुळे शहरात सखल भागात पाणी जमले होते. तेल्हारा शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात पावसामुळे वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. हा अवकाळी पाऊस रब्बी गहू, हरबरा , तूर ,मका, करडी या पिकांसाठी जीवदान देणारा ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी झालेल्या पावसामुळे तेल्हारा शहरात सायंकाळी तापमान कमी झाले. परिणामी थंडीत चांगलीच वाढ झाली होती. या अवकाळी पावसामुळे भर हिवाळ्यात तेल्हारा मध्ये पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक वाचा : महिला काँग्रेस ची स्थापना करूना महिला सक्षमीकरण पाठ देणाऱ्या खंबीर नेत्या इंदिराजी – डॉ सौ संजीवनी बिहाडे
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola