अकोला (शब्बीर खान) : कत्तलीकरिता घेउन जात असलेल्या पाच गोवंशांना उप विभागीय पोलिस अधिकारी उमेश माने यांचे विशेष पथक व रामदास पे’ पोलिसांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत जीवदान दिल्याची घटना बुधवार, १४ नोव्हेंबर रोजी उशिरा रात्री घडली. कारंजाहून अकोलाकरिता कत्तलीसाठी गोवंश नेले जात असल्याची माहिती विशेष पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. यावेळी एमएच ३६ एफ २८८४ क्रमांकाचे बोलेरो वाहन अडविण्यात आले. पोलिसांनी चार आरोपींना अटक करून पाच गोवंशांना जीवनदान दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, उप विभागीय पोलीस अधिकारी माने, पो.नि.शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. प्रेमानंद कात्रे, विशेष पथक प्रमुख तुषार नेवारे, पो. ह. विनय जाधव, राज चंदेल, पोकॉ स्वप्निल यांनी केली. भीमा देवा जाधव (३२) रा. दादगाव, पिरू हसन पप्पूवाले (५०), रा. गवळीपुरा, रणजित रतन जाधव (३५) रा. दादगाव, रन्नूू लल्लू बेनिवाले (६०) रा. जाम मोहल्ला गवळीपुरा अकोला अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
अधिक वाचा : मुख्यमंत्री यांच्याकडून अकोट तालुक्यातील पुर्नवसित गावांना अनोखी भेट
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola