सुशांत सिंग राजपूत आणि सारा अली खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज झालाय. चित्रपटाच्या टीजरप्रमाणेच ट्रेलरही शानदार आहे. केदारनाथ महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर साकारण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये एक हिंदू तरूणी आणि एक मुस्लिम तरूणाची प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. तूर्तास यावरूनच हा चित्रपट वादात सापडला आहे. हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारा असल्याचा दावा करत, केदारनाथमधील पुजाºयांनी आणि हिंदू संघटनांनी ‘केदारनाथ’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
या वादादरम्यान दिग्दर्शक अभिषेक कपूर, सारा अली खान व सुशांत सिंग राजपूत यांच्या उपस्थितीत ‘केदारनाथ’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलरमधील सारा आणि सुशांत यांचा अभिनय बघण्यासारखा आहे. केदारनाथमधील मनोहारी दृश्ये, विनाशकारी महाप्रलय सगळे काही चित्तथरारक आहेत. पहिल्याच चित्रपटातील साराचा अभिनयही प्रेमात पाडणारा आहे.
येत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.
अधिक वाचा : आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ ला प्रेक्षकांची नापसंती
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola