• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद 250 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त

City Reporter by City Reporter
June 2, 2020
in Featured, अकोला, अकोला शहर
Reading Time: 1 min read
78 1
0
पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या  जनता तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद 250 नवीन तक्रारी जनतेकडून प्राप्त
11
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. आज सोमवार दि. 05 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या या उपक्रमात विविध विभागांच्या 250 तक्रारी प्राप्त झाल्या. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन तक्रार घेऊन आलेल्या नागरिकांच्या तक्रारी स्विकारल्या. यावेळी त्यांनी तक्रारदारांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन तक्रारींचा 15 दिवसाच्या आत निपटारा करण्यात येईल, असा दिलासाही तक्रारकर्त्याना दिला. आणि उपस्थित नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात.

जनतेच्या तक्रार निवारण सभेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,जिल्हा पोलीस अधीक्षक एम, राकेश कलासागर, जिल्हा परिषदचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपविभागीय अधिकारी उदय राजपूत, अभयसिंग मोहिते, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी उज्वल चोरे,शरद झांबरे,रवि लोखंडे, प्रविण साखरे,आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

सर्वप्रथम पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.

मागील सभेत प्राप्त झालेल्या जुन्या तक्रारींचा विभागवारआढावा पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेतला. यात महसुल, जिल्हा परिषद , मनपा , पोलीस विभाग , महावितरण , कृषी , सहकार आदी विभागाचा समावेश हेाता. पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत विभागाच्या तक्रार कर्त्यांचा नावाचा पुकारा केल्यानंतर प्रत्यक्ष संबधीत विभागाच्या अधिका-यांसमोर समक्ष तक्रार कर्त्यांची तक्रार जाणून घेवून या तक्रारींवर काय कारवाई करण्यात आली. याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून त्यांनी जाणून घेतली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवसांत कोणत्याही परिस्थितीत तक्रारींचे निराकरण करावे. तक्रारीवर काय कारवाई केली. याबाबतच्या अनुपालनाची प्रत आपल्याला व संबंधित तक्रारदाराला वेळेत देण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री यांनी यावेळी दिले. तसेच पालकमंत्री म्हणाले की, प्रशासनाकडून समस्या तातडीने सोडविल्या गेल्या पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते, तक्रार प्राप्त झाल्यावर त्याबाबतची प्राथमिक माहिती घेवूनच अधिकाऱ्यांनी जनता दरबारात उपस्थित राहावे, असेही ते म्हणाले.

पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी नवीन आलेल्या अर्जदारांचे निवेदने जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय व इतर अधिका-यांसोबत स्वत: तक्रारकर्त्याकडे जावून स्विकारले. 15 दिवसाच्या आत सबंधीत विभागाकडून आपणास आपल्या तक्रारीवर काय कार्यवाही करण्यात आली या बाबतचा अनुपालन अहवाल कळविण्यात येईल. अशी तक्रारकतर्यांना ग्वाही दिली. व संबंधीत अधिका-यांना तशा सुचना दिल्यात. जनतेच्या तक्रारीचे व्यवस्थीत समाधान व्हावे हा या उपक्रमामागचा उददेश असल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले.

जनतेकडून प्राप्त झालेल्या विविध विभागांच्या समस्या विषयक तक्रारींची त्वरीत दखल घेऊन पालकमंत्री स्वत: प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करणार आहेत. तसेच तातडीचेकामे 15 दिवसाच्या आत पुर्ण करावी असे निर्देश संबंधीताना यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.

आज झालेल्या जनतेच्या तक्रार निवारण सभेत एकूण 250 तक्रारी जनतेकडून प्राप्त झाल्या. यामध्ये वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश होता. विविध विभागांच्या कामांबाबतच्या लेखी स्वरूपातील तक्रारी नागरिकांनी पालकमंत्री यांना दिल्या. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधित विभागाप्रमुखांकडे विचारणा करुन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचित केले. तत्पुर्वी पालकमंत्री यांनी मागील सभेत प्राप्त तक्रारींवर अधिका-यांनी काय कार्यवाही केली याबाबत चौकशी केली. झालेल्या कार्यवाहीवर तक्रारदारांचे समाधान झाले का, याची विचारणा त्यांनी तक्रारदारांना करुन पुढील तक्रारी स्विकारण्यास सुरुवात केली.

विभागनिहाय प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील पुढील प्रमाणे आहे, महसूल विभाग – 96 तक्रारी, पोलीस विभाग—27, जिल्हा परिषद– 52, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था -03, महानगर पालिका– 12, अग्रणी बँक – 06, विद्युत विभाग –11, भूमी अभिलेख – 02, कृषी विभाग – 23 , जात पडताळणी समिती – 03, सार्वजनिक बांधकाम विभाग -01, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी – 01, व इतर 13 अशा एकुण 250 तक्रारी यावेळी प्राप्त झाल्या

Previous Post

मूर्तीजापुर येथे रूग्णवाहीकेचा लोकापर्ण सोहळा थाटात संपन्न

Next Post

बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी

बारावी पास उमेदवारांसाठी एअरपोर्टवर नोकरीची सुवर्णसंधी

अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलिसाला उडवले; जागीच मृत्यू

अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलिसाला उडवले; जागीच मृत्यू

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.